Coronavirus Update In India: महाराष्ट्र, नवी दिल्ली, केरळ, राजस्थान सह जाणून देशातील अन्य राज्यांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या

भारतात कोरोना बाधितांची संख्या 3577 वर पोहोचली असून 83 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा आकडा पाहता देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे हे दिसत आहे.

Coronavirus Death | Photo Credits: Pixabay.com

भारतात (Indi) कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. ही स्थिती खूपच चिंताजनक असून परिस्थिती आटोक्यात येईल असे वाटत असताना दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे ही संख्या झपाट्याने वाढत गेली. आज दिवसभरामध्ये भारतात कोरोना (Coronavirus) बाधितांची संख्या 3577 वर पोहोचली असून 83 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा आकडा पाहता देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे हे दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 505 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. भारतातील 3577 रुग्णांमध्ये 3219 सक्रिय केसेस असून, 275 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

तर महाराष्ट्रात सध्याच्या अपडेटनुसार, कोरोना बाधितांची संख्या 748 झाली असून 56 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

पाहूया भारतातील अन्य राज्यांतील कोरोना बाधितांची संख्या

S. No. Name of State / UT Total Confirmed cases (Including 65 foreign Nationals) Cured/Discharged/Migrated Death
1 Andhra Pradesh 190 1 1
2 Andaman and Nicobar Islands 10 0 0
3 Arunachal Pradesh 1 0 0
4 Assam 26 0 0
5 Bihar 30 0 1
6 Chandigarh 18 0 0
7 Chhattisgarh 9 3 0
8 Delhi 503 18 7
9 Goa 7 0 0
10 Gujarat 122 18 11
11 Haryana 59 25 1
12 Himachal Pradesh 6 1 1
13 Jammu and Kashmir 106 4 2
14 Jharkhand 3 0 0
15 Karnataka 144 12 4
16 Kerala 306 49 2
17 Ladakh 14 10 0
18 Madhya Pradesh 165 0 9
19 Maharashtra 490 42 24
20 Manipur 2 0 0
21 Mizoram 1 0 0
22 Odisha 20 0 0
23 Puducherry 5 1 0
24 Punjab 57 1 5
25 Rajasthan 200 21 0
26 Tamil Nadu 485 6 3
27 Telangana 269 32 7
28 Uttarakhand 22 2 0
29 Uttar Pradesh 227 19 2
30 West Bengal 80 10 3
Total number of confirmed cases in India 3577* 275 83

हेदेखील वाचा- Coronavirus: भारतात कोरोना बाधितांची संख्या 3577 वर तर मृतांचा आकडा 83 वर- आरोग्य मंत्रालय

तर मुंबईत आज कोरोनाचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महानगरपालिका बृहत्तर मुंबई यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडिओच्या माध्यमातून बातचीत करत लॉकडाउन वाढवायचा की नाही आता हे नागरिकांच्या हातात असल्याचे म्हटले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी गर्दी करु नये असे वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघटन करताना दिसून येत असल्याने परिणामी कायदेशीर कारवाई करावी लागत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now