Coronavirus Lockdown 5.0: सरकारकडून धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी पण गोव्यातील चर्च आणि मशीद आणखी काही काळ बंदच राहणार
देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचा आदेश कायम राहणार आहे. तर लॉकडाऊनच्या 5.0 मध्ये नियमात शिथीलता आणत काही गोष्टी टप्प्याटप्प्यानुसार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचा आदेश कायम राहणार आहे. तर लॉकडाऊनच्या 5.0 मध्ये नियमात शिथीलता आणत काही गोष्टी टप्प्याटप्प्यानुसार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर लॉकडाऊन 5.0 मधील दुसरा टप्पा 8 जून पासून सुरु होणार आहे. यावेळी धार्मिक स्थळे, ऑफिसे, बस सुविधा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु सरकारने जरी धार्मिक स्थळ सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तरीही गोव्यातील चर्च आणि मशीद आणखी काही काळ बंदच राहणार असल्याचे चर्चच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
गोव्यात अचानक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. शनिवारी गोव्यात आणखी 71 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 202 वर पोहचला आहे. त्यापैकी 65 जणांची प्रकृती सुधारली आहे. गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.(दिलासादायक! सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून नष्ट होईल Coronavirus; नवीन रिपोर्टमध्ये दावा, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 246628 वर पोहचला असून 6929 जणांचा बळी गेला आहे. तर 120406 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु असून 119292 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पण वैद्यकिय कर्मचारी, नर्स आणि डॉक्टर्स यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी सुद्धा या काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)