Lockdown: लॉकडाऊन नंतर पुढे काय? केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वं

त्यामुळे छोट्याशा गावातील छोट्या दुकानापासून ते विमान कंपन्यांपर्यंत असे देशभरातील जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. अपवाद केवळ अत्यावश्यक सेवांचा. त्यामुळे लॉकडाऊन नंतर पुढे काय? याबाबत सर्वच क्षेत्रातून मोठी उत्सुकता आहे.

Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Lockdown: लॉकडाऊन (Lockdown) हटवल्यानंतर उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमत्रालयाने ( Ministry of Home Affairs) काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे छोट्याशा गावातील छोट्या दुकानापासून ते विमान कंपन्यांपर्यंत असे देशभरातील जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. अपवाद केवळ अत्यावश्यक सेवांचा. त्यामुळे लॉकडाऊन नंतर पुढे काय? याबाबत सर्वच क्षेत्रातून मोठी उत्सुकता आहे.

गृह मंत्रक्षालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, देशभरातील उद्योग व्यवसाय हे टप्प्याटप्याने सुरु करण्यात येतील. त्यासाठी पहिला आठवडा हा केवळ एक प्रयोग म्हणून (ट्रायल बेसीस) पाहिला जाईल. या काळात उद्योजक, व्यवसायिक आणि जनतेनेही नियमांचे काटेकोर पालण करणे आवश्यक आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न करण्याचे लक्ष्य उद्योजक, व्यवसायिक आणि कंपन्यांनी ठेऊ नये. तसेच, तसा प्रयत्नही करुन नये.

दरम्यान, देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या पाहून केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 17 मे पर्यंत लागू केला आहे. हा लॉकडाऊन आगोदर 3 मे रोजी समाप्त होणार होता. पण, एक पत्रक काढून केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीतून जात आहे. (हेही वाचा,भारतात 3277 नव्या COVID-19 रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची संख्या 62,939 वर )

एएनआय ट्विट

सरकार एका बाजूला लॉकडाउन हटविण्याबाबत विचार करत असतानाच दुसऱ्या बाजूला देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी सांगितले की, भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 62,939 वर पोहचली आहे. मृतांचा आकडा 2000 पेक्षाही वर जाऊन 2,109 वर पोचला आहे.