Coronavirus मुळे भारताच्या विकास दरात होणार 'इतकी' घसरण; S & P Global कंपनीचा अंदाज

अमेरिकन आर्थिक समीक्षक कंपनी S & P Global यांच्या अंदाजांनुसार भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे नुकसान सहन करावे लागू शकते,

Image For Representation (Photo Credits: Pixabay)

जगभराला विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका अनेक देशाच्या अर्थव्यव्यस्थेवर (World Economy) होत आहे, भारतात ही येत्या काळात म्हणजेच 2020च्या वर्षासाठी अपेक्षित असणारा विकास दर (India's Growth Forecast)  आता घसरत आहे. अमेरिकन आर्थिक समीक्षक कंपनी S & P Global यांच्या अंदाजांनुसार भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे नुकसान सहन करावे लागू शकते, परिणामी देशाचा आर्थिक विकास दर हा 5. 2 इतकाच असेल. प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी याच कंपनीने भारताचा विकास दर 2020 साठी 5.7  असेल असे भाकीत वर्तवले होते. पीटीआयच्या सूत्रानुसार, आज S & P Global कंपनीकडून हा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

केवळ भारतच नव्हे तर या कोरोनाचा फटका संपूर्ण आशिया- पॅसिफिक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत 3  टक्क्याने कमी विकासदर असेल, त्यामुळेच जवळपास अर्ध्याहून जास्त जगाला मंदीचा मारा सहन करावा लागणार आहे. याचे काहीसे पडसाद आता सुद्धा पाहायला मिळतआहेत , चीन मध्ये पहिल्याच तिमाहीत अर्थव्यवस्थेला बसलेला शॉक, अमेरिका आणि युरोप मध्ये सर्व काही बंद कारवाई लागल्याने झालेले नुकसान, जगभरात अनेक व्यवसायांची झालेली हानी यामुळे व्यापार कमी होत असून परिणामी अर्थव्यवस्थेला धोका पोहचत आहे. असेही या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे. (Coronavirus मुळे 'या' क्षेत्राला सर्वात मोठा फटका; जगभरातील 5 कोटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा?)

PTI ट्विट

दरम्यान, मंगळवारी मूडीज या गुंतवणूक समीक्षक कंपनीने सुद्धा भारताचा आर्थिक विकास दर हा 2020 साठी 5.3 % इतका असेल असे सांगितले आहे, यापूर्वी या कंपनीने सुद्धा हा अंदाज 5.4 असेल असे सांगितले होते. सद्य घडीला भारतात सर्वात जास्त नुकसान हे विमान सेवा कंपन्यांचे झाले आहे, तर निर्यात थांबल्याने शेतमालाला कमी किंमत मिळत आहे. पोल्ट्री व्यवसाय मागील काही काळात कोट्यवधी रुपयांच्या नुकसानात आहे.