Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 3,80,532 वर; मागील 24 तासांत 13,586 रुग्णांच्या मोठ्या भरीसह 336 मृतांची नोंद
तर 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3,80,532 वर पोहचला आहे.
भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दर दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असून मागील 24 तासांतही 13,586 कोरोना बाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3,80,532 वर पोहचला आहे. त्यापैकी 1,63,248 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 2,04,711 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात एकूण 12,573 कोरोनाग्रस्त रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. (Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ! 3752 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1,20,504 वर)
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक असून मुंबई, दिल्ली या महत्त्वाच्या शहरांभोवती कोविड-19 चा विळखा अधिक तीव्र आहे. दरम्यान कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत असली तरी देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडाही चांगला आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. कालच्या दिवशी देशाचा रिकव्हरी रेट 52.95% इतका होता.
ANI Tweet:
16 आणि 17 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्या बैठकीत आता पुन्हा लॉकडाऊन होणार नसून आता देश केवळ अनलॉक होईल असे सांगत मोदींनी देशवासियांना आश्वस्त केले आहे. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले.