IPL Auction 2025 Live

Coronavirus in India: भारतात एकूण 31332 कोरोना बाधित तर 1007 रुग्णांचा मृत्यू

तर यात 1007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 7695 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजही त्यात 1897 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 31332 वर पोहचला आहे. तर यात 1007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 7695 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 22,629 कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश येथे कोरोनाचे संकट अधिक तीव्र होऊ लागले आहे. या राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेलं राज्य आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ पाहयला मिळत आहे. राज्यात एकूण 9318 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यापैकी 1388 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तर 7530 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 400 रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना रुग्णांवर आता प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग केला जाणार आहे.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसची वाढती साखळी तोडण्यासाठी भारतात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दरम्यानही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे 3 मे नंतरही लॉकडाऊन वाढणार का? राज्यातील आणि देशातील परिस्थिती नेमकी काय असणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.