Coronavirus In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा करणार देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा
आज (16 जून) आणि उद्या (17 जून) देशातील विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोव्हिड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज (16 जून) आणि उद्या (17 जून) देशातील विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोव्हिड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमधील बैठक व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारा होणार आहे. यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांचादेखील समावेश असेल. दरम्यान आज पंजाब, केरळ, गोवा,उत्तराखंड, झारखंड आणि ईशान्य भारतातील राज्यांसोबत नरेंद्र मोदी चर्चा करतील. Fact Check: कोव्हिड 19 चा भारतातील उच्चांक नोव्हेंबरच्या मध्यावर होईल असा दावा करणारा अभ्यास ICMR ने केलेला नाही; PIB Fact Check ने केला खुलासा.
बुधवार, 17 जून दिवशी पंतप्रधान दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांसोबत चर्चा होईल. दरम्यान 24 मार्चपासून भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर चौथ्या टप्प्यात 11 मे दिवशी पंतप्रधान आणि देशातील विविध राज्यांमधील मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली होती. दरम्यान आज ही सहावी बैठक असेल. देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरीही रूग्ण बरे होण्याचा दरही सुधारत आहे. सध्या तो 51.08% इतका आहे. देशामध्ये 901 लॅब्स कार्यान्वित असून त्यांच्याद्वारा कोरोना चाचणी केल्या जात आहेत.
ANI Tweet
देशात एकूण कोव्हिड 19 ची लागण झालेल्यांचा आकडा 332424 वर पोहचला आहे. भारताचा जगाच्या क्रमवारीमध्ये चौथा क्रमांक लागतो. अमेरिका, ब्राझिल, रशियानंतर भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. अशी माहिती worldometers.info या वेबसाईटने दिली आहे.