Coronavirus in India: भारतात मागील 24 तासांत 13,925 रुग्ण कोरोनामुक्त; आजचा रिकव्हरी रेट 55.49%

त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत असून आजचा (21 जून रविवार) रिकव्हरी रेट 55.49%असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) सुधारत असून आजचा (21 जून रविवार) रिकव्हरी रेट 55.49%असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे. तसंच भारतात आतापर्यंत 2,27,755 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मागील 24 तासांत 13,925 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येत प्रत्येक दिवशी मोठी भर पडते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांतही 15413 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4,10,461 वर पोहचला आहे. त्यापैकी 169451 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 227756 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशात एकूण 13254 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

ANI Tweet:

कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशातील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. मागील 24 तासांत 1,90,730 सॅपल टेस्ट करण्यात आल्या असून आतापर्यंत देशात एकूण 68,07,226 सॅपल टेस्ट पार पडल्या आहेत.

कोविड-19 चा प्रभाव जगभरात असून कोरोना बाधितांची संख्या आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. तर कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक चौथा आहे.