Coronavirus In India: भारतामध्ये मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 28,472 रूग्णांना डिस्चार्ज; रिकव्हरी रेट 63% च्या पार!
आज मागील 24 तासांमध्ये देशात सर्वाधिक 28, 472 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतामध्ये सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजारांपेक्षा अधिकने वाढत असल्याने सामान्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. मात्र आज आरोग्य विभागाने भारतातील कोरोना परिस्थितीबद्दल एका दिलासादायक बातमी दिली आहे. आज मागील 24 तासांमध्ये देशात सर्वाधिक 28, 472 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान मार्च महिन्यापासून भारतामध्ये कोरोनाची दहशत वाढत आहे. त्यामध्ये आतापर्यंत सुमारे 7.5 लाख रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या देशाचा कोविड 19 रिकव्हरी रेट हा 63 च्या पार गेला आहे. दरम्यान भारतामध्ये 19 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा रिकव्हरी रेट हा देशाच्या रिकव्हरी रेट म्हणजे 63.13% पेक्षा देखील अधिक आहे. Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधिताचा आकडा 11,92,915 वर; मागील 24 तासांत COVID19 च्या 37,724 नव्या रुग्णांसह 648 रुग्णांचा मृत्यू.
भारत हा जगातील कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. सध्या भारतामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 11लाख 92 हजारांपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे. अद्याप कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने नागरिकांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुण्याचं आवाहन करण्यात येत आहे. भारतासह जगभरात सध्या कोरोना विरूद्ध लढण्यासाठी लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे.
ANI Tweet
महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट हा 55% पेक्षा अधिक आहे तर मुंबईचा रिकव्हरी रेट 71% आहे. सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. मुंबई, पुणे, ठाणे मध्ये अॅक्टिव्ह रूग्णांचे प्रमाण अधिक असल्याने तेथे राज्य सरकारच्या कडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.