Coronavirus in India: देशात मागील 24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ; एकूण रुग्णसंख्या 38,53,407 तर 67,376 जणांचा मृत्यू

मागील 24 तासांत आतापर्यंतच्या उच्चांकी वाढीची नोंद झाली आहे. 83,883 नव्या रुग्णांची भर पडली असून 1,043 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत आतापर्यंतच्या उच्चांकी वाढीची नोंद झाली आहे. 83,883 नव्या रुग्णांची भर पडली असून 1,043 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 38,53,407 इतका झाला आहे. त्यापैकी 8,15,538 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 29,70,493 रुग्णांनी कोरोना संसर्गावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान आतापर्यंत देशात एकूण 67,376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health & Family Welfare) देण्यात आली आहे.

देशातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा नक्कीच चिंताजनक आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. परंतु, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत असून मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (मुंबईत आज आणखी 1 हजार 622 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; येथे पाहा संपूर्ण आकडेवारी)

ANI Tweet:

देशात कनटेंमेट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान अनलॉकच्या चौथ्या टप्प्यालाही सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे सरकारी नियमांचे पालन करुन स्वतःची आणि इतरांची सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.