कोरोना व्हायरस संकटात रक्त पुरवठ्याचा तुटवडा, रक्तदात्याच्या घरीच करणार रक्तदानाची सोय; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक खास उपाय शोधला आहे. रक्तदान करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी रक्तदात्याच्या घरातून रक्त घेतले जाणार आहे.
देशावर घोंगावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम प्रत्येक बाबतीत दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे रक्तदान शिबीर आयोजित करता येत नसल्याने रक्तपेठीत रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी एक खास उपाय शोधला आहे. रक्तदान करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी रक्तदात्याच्या घरी जावून रक्त घेतले जाणार आहे. जिथे शक्य आहे तिथे रक्तदात्याच्या घरी जावून रक्त घेतले जाणार आहे. ते शक्य नसल्यास रक्तदात्याला सुविधा पुरवून संबंधित ठिकाणी बोलावून रक्त घेण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात कोरोनाची राज्यातील परिस्थिती, त्यावरील उपाययोजना आणि तयारी याबद्दल आढावा घेण्यात आला. (Coronavirus Lockdown चं बंधन पाळत नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी बाहेर पडा: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन)
ANI Hindi Tweet:
सध्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता 14 एप्रिल नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. आतापर्यंत केवळ ओडिशा राज्याने लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवला आहे. भारतात सध्या 6,412 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 504 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर या जीवघेण्या व्हायरसने देशात 199 लोकांचा बळी घेतला आहे.