HC On Rape and Consensual Sex: संमतीने लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे- हायकोर्ट

सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर तक्रारदाराने आरोपीविरुद्ध परस्पर संमतीने एक दोन नव्हे तर तब्बल 6 वर्षे लैंगिक संबंध ठेवले.

कोर्ट । ANI

Consensual Sex Is Not Rape: लग्नाचे अमिष दाखवून परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका महिलेचा बलात्काराचा दावा फेटाळून लावत कोर्टाने आरोपीला मुक्त केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर तक्रारदाराने आरोपीविरुद्ध परस्पर संमतीने एक दोन नव्हे तर तब्बल 6 वर्षे लैंगिक संबंध ठेवले. त्यामुळे त्याला बलात्कार मानता येणार नाही, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) एका पुरुषाविरुद्धचे ‘बलात्कार आणि फसवणूक’चे दोन गुन्हे रद्द केले. लग्नाचे खोटे आमिश देऊन आपणावर वारंवार बलात्कार झाल्याचा तक्रारदाराचा दावा होता.

कोर्टाने निर्णय देताना निरीक्षण नोंदवले की, तक्रारदाराच्या अशा प्रकारच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु ठेवण्याची प्रवागनी दिली तर तक्रारदाराच्या कायद्याचा वारंवार गैरवापर करण्याच्या कृतीला भरीस घातल्यासारखे होईल. तक्रारदाराने अशा प्रकारचे आरोप आणि तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तक्रारकर्त्याने अनेक वेळा अशी याचिका दाखल केली आहे. ज्यात आरोपी निर्दोश सुटले आहेत आणि तक्रारकर्त्याला आपली तक्रार मागे घ्यावी लागली आहे. (हेही वाचा, करण्याची गरज; Bombay High Court चं मत)

कोर्टाने म्हटले की, तक्रारदाराने स्वत: आरोपीसोबत 2019 पर्यंत संमतीने लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिदली आहे. सहा वर्षांच्या संमतीने संभोग केल्यावर जवळीक कमी होणे याचा अर्थ असा होऊ शकत नाही की ते भारतीय दंड संहितेच्या कलम 375 (बलात्कार) चे घटक बनतील. आरोपीविरुद्धच्या कार्यवाहीमुळे अशा संबंधांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निकालांचे उल्लंघन होईल.