Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला; अपघाताचे कारण उलगडण्यास होणार मदत

विमान अपघाताच्या ढिगाऱ्यातून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) सापडला आहे. यामुळे या अपघातामागील संभाव्य कारण ओळखण्यास मदत होणार आहे.

Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला; अपघाताचे कारण उलगडण्यास होणार मदत
Cockpit voice recorder Found (फोटो सौजन्य -X/ @ddnews_jammu)

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान एआय-171 च्या अपघाताच्या (Ahmedabad Plane Crash) प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता या अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. एअर इंडिया विमानाचा (Air India Plane) कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (Cockpit Voice Recorder) सापडला आहे. विमान अपघाताच्या ढिगाऱ्यातून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) सापडला आहे. यामुळे या अपघातामागील संभाव्य कारण ओळखण्यास मदत होणार आहे.

अहमदाबाद विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला. तथापी, ज्या ठिकाणी हे विमान पडले, त्याठिकाणच्या जवळपास 50 हून अधिक जणांचा यात मृत्यू झाला होता. यापूर्वी अधिकाऱ्यांना विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सापडला होता. अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांना ब्लॅक बॉक्स सापडल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातातील 80 मृतांचे DNA नमुने जुळले; 33 जणांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द)

दरम्यान, अधिकृत निवेदनात म्हटले आहे की पी.के. मिश्रा यांनी अहमदाबाद अपघातासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार, विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मदत, बचाव आणि तपास प्रयत्नांवर चर्चा केली. (हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: टाटा ग्रुपनंतर एअर इंडियानेही जाहीर केली भरपाई; विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना मिळणार 25 लाख रुपये)

पंतप्रधानांच्या सचिवांनी घेतली उच्चस्तरीय आढावा बैठक - 

या विमान अपघाताची एएआयबीने सविस्तर चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल अंतर्गत विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. कारण अपघातग्रस्त विमान हे अमेरिकेत तयार केले गेले होते. अधिकाऱ्यांनी डॉ. मिश्रा यांना सांगितले की, फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) सापडले असून ते पूर्णपणे सुरक्षित आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 10:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).