रॅलीमध्ये हल्ला झाल्यास या पद्धताने सामना करा,जवानांनी नरेंद्र मोदी यांच्या समोर सादर केले ड्रिल प्रात्यक्षिक (Video)
त्यासाठी भारतीय जवान तयार असल्याचे म्हटले आहे.
जर कोणत्याही नेत्याच्या सभेत कोणतेही दुर्घटना झाल्यास अशावेळी काय करावे असा प्रश्न उपस्थितीत होते. त्यासाठी भारतीय जवान तयार असल्याचे म्हटले आहे. म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समोर भारतीय जवानांनकडून (Indian Army) रॅलीमध्ये हल्ला झाल्यावर कसे सामोरे जायचे त्याबद्दल मॉक ड्रिल (Mock Drill) प्रात्यक्षिक करुन दाखवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकातीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाच्या 50 व्या स्थापना दिवसानिमित्त उपस्थिती लावली होती. त्यावेळी जवानांनी ड्रिलचे प्रात्यक्षिकेसुद्धा मोदी यांच्या समोर सादर करुन दाखवली. त्यामध्ये एका मॉक ड्रिल प्रात्यक्षिकात कोणत्याही संकटवेळी आलेली परिस्थितीवर कशी मात करु शकतो हे दाखविले.
या मॉक ड्रिलमध्ये असे दाखवण्यात आले की, एखादा नेता भाषण देत आहे. त्यावेळी कोणताही हल्ला झाल्यास जवान त्या नेत्याला वाचवत हल्ल्या करणाऱ्या व्यक्तिला प्रतिउत्तर देत पुढे जात असल्याचे दाखवण्यात आले.
हल्ला झाल्यास मुख्य त्या नेत्याने तेथून निघावे. तसेच जवानांकडून त्या नेत्याला सुखरुपणे हल्ला झालेल्या ठिकाणाहून दुसरीकडे एका मिनिटात हलवले जात असल्याचे प्रात्यक्षिकात दाखवले आहे. याबद्दल दुरदर्शन चॅनलवरुन या प्रात्यक्षिकांबद्दल दाखवण्यात आले आहे.