Nigeria Stampede: नायजेरियात ख्रिसमसपूर्वी मोठी दुर्घटना; चर्चमध्ये चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू
नायजेरियामध्ये अबुजा येथील मैतामा जिल्ह्यातील स्थानिक चर्चमध्ये मदत सामग्रीचे वितरण सुरू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत चार मुलांसह किमान 10 जणांचा मृत्यू झाला.
Nigeria Stampede: नायजेरियाची (Nigeria)राजधानी अबुजा येथील मैतामा जिल्ह्यातील स्थानिक चर्चमध्ये मदत साहित्य वाटप सुरू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत (Church Stampede) चार मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. फेडरल कॅपिटल टेरिटरीमधील पोलिस प्रवक्त्या जोसेफिन एडेह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ख्रिसमसच्या उत्सवापूर्वी अन्न आणि कपड्यांसह मदत वस्तूंच्या वितरणादरम्यान शनिवारी मैतामा येथील होली ट्रिनिटी कॅथोलिक चर्चमध्ये गोंधळ उडाला तेव्हा आठ लोक जखमी झाले.
"जखमींपैकी चार जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींना सध्या वैद्यकीय सेवा दिली जात आहे," एडेह म्हणाले. या दुर्धटनेनंतर पोलिसांनी एक हजाराहून अधिक लोकांचा जमाव यशस्वीपणे पांगवला. नायजेरियाच्या कॅथोलिक सचिवालयाचे प्रवक्ते पाद्रे माईक एनसिकाक उमोह यांनी सांगितले की, जवळपासच्या गावातील आणि कमी उत्पन्न असलेले 3,000 हून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम शनिवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत सुरू होणार होता, तरीही अनेक लोक स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजता तेथे पोहोचले. स्थानिकांना अन्नधान्य वितरित करण्याचा उपक्रम घातक ठरला. अनेकांचा बळी गेला, अनेक जन जखमी झाले.