Chief Justice Sharad A Bobde: न्यायमूर्ती शरद बोबडे म्हणाले, 'महिलांचा सर्वोच्च सन्मान करतो, बलात्काऱ्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव कधीच नाही दिला'

मीडिया आणि एक्टिव्स्टने या प्रकरणात आपण त्याच्यासोबत विवाह करणार का या टिप्पणीचा चुकीच्या दृष्टीकोणातून पाहिले. ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला.

Sharad A Bobde | (File Photo)

स्त्री अत्याचाराच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) करण्यात आलेल्या 'तिच्यासोबत लग्न करणार' या टिप्पणीवरुन निर्माण झालेल्या वादावर न्यायमूर्ती शरद बोबडे (SA Bobde) यांनी मत व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटले की, न्यायालय आणि एक संस्था म्हणून आम्ही नेहमीच महिलांचा सन्मान करतो. मीडिया आणि एक्टिव्स्टने या प्रकरणात आपण त्याच्यासोबत विवाह करणार का या टिप्पणीचा चुकीच्या दृष्टीकोणातून पाहिले. ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि न्यायालयाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला.

न्यायमूर्तींनी बोबडे यांनी म्हटले की, न्यायालयाने महिलांना अधिक सन्मान दिला आहे. आम्ही सुनावणीदरम्यानही कोणताही सल्ला दिला नाही की तुम्ही विवाह करा. आम्ही केवळ हे विचारले होते की, तुम्ही लग्न करणार का? या प्रकरणात अत्यंत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आले.एक संस्था आणि न्यायालय म्हणून आम्ही नेहमीच स्त्रीयांप्रति आदर आणि सन्मान ठेवतो.

याचिकाकर्त्या वकिलांनी म्हटले की, काही लोक न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन करत आहेत. अशा लोकांवर अंकूश ठेवण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करायला हवी. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, खंडपीठांच्या हातात आपली प्रतिष्ठा आहे. आम्हाला अशा प्रकारे संरक्षण करण्याची आवश्यकता नाही. सुनावणीदरम्यान एसजी मेहता यांनी म्हटले की, प्रकरणात न्यायाधिशांचे विधान पूर्णपणे मोडतोड करुन प्रसारित करण्यात आले. ज्यात विवाह आणि समझोता यांबाबत काही सल्ला देण्यात आला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif