विंग कमांडर अभिनंदन वर्थमान दुखापतींवर मात करून पुन्हा सेवेत रूजू; एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ सोबत उडवले मिग-21
पंजाब येथील पठाणकोट एअरबेसवरून त्यांनी हे उड्डाण केले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणावाच्या बनलेल्या स्थितीदरम्यान पाकिस्तानच्या एफ-16 या अत्याधुनिक विमानाला पाडताना जखमी झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे सहा महिन्यांच्या आतमध्ये पुन्हा सेवेत रूजू झाले आहे. आज विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ (Air Chief Marshal BS Dhanoa) यांच्यासोबत मिग-21 विमानामधून उड्डाण केले. पंजाब येथील पठाणकोट एअरबेसवरून त्यांनी हे उड्डाण केले आहे. सध्या अभिनंदन यांना राजस्थानमधील आयएएफच्या तळावर तैनात करण्यात आले आहे. भारतीय वायुसेना विंग कमांडर अभिमान वर्धपान पाकिस्तान मधून अटारी वाघा बॉर्डरमार्गे मायदेशात सुखरुप परतले, पाहा फोटो आणि व्हिडिओ
27 फेब्रुवारी दिवशी फायटर विमानासोबत झालेल्या चकमकीमध्ये मिग 21 बायसन हे भारतीय विमान पाकव्याप्त कश्मीरमध्ये कोसळले. त्याआधी अभिनंदन यांनी पाकचे विमान पाडले. मिग-21 मधून इजेक्ट झाल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना वर्धमान जखमी झाले होते. मात्र आता त्यांनी सार्या दुखापतींवर मात केली आहे. काही दिवसांपूर्वीच वर्धामान यांना वीर चक्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
ANI Tweet
एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ हे देखील फायटर पायलट आहेत. आज अभिनंदन सोबत उड्डाण केल्यानंतर त्यांनी अभिनंदन याच्या शौर्याचं, जिद्दीचं कौतुक केलं आहे. अभिनंदनला त्यांच्या उड्डाणाची कॅटेगरी परत मिळाली आहे. 1988 साली धनोआंना अशाप्रकारे दुखापतीवर मत करून पुन्हा वर येण्यास 9 महिन्यांचा काळ लागला होता. पण अभिनंदनने त्याची कॅटेगरी सहा महिन्यांच्या आधीच पुन्हा मिळवली आहे.