छत्तीसगड: नक्षलवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवल्याचा सुरक्षा दलाला संशय, मोठ्या प्रमाणात शस्रात्रं जप्त

तर अशा प्रकारची शस्रे ही पाकिस्तान (Pakistan) त्यांच्या लष्करासाठी वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Representational Image | (Photo Credit: PTI)

छत्तीसगड (Chhattisgarh) येथील कांकेरमध्ये चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडे अमेरिका बनावटीची जी-2 रायफल मिळाली आहे. तर अशा प्रकारची शस्त्रासं ही पाकिस्तान (Pakistan) त्यांच्या लष्करासाठी वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे छत्तीसगड येथील नक्षलवाद्यांना (Naxals) पाकिस्तानकडून रसद पुरवली जात असल्याचा संशय सुरक्षा दलाने व्यक्त केला आहे. तसेच ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्रासे जप्त करण्यात आली आहेत.

सुरक्षा दलाच्या जवान कांकेर येथील तकोडीत गस्त घालत असताना काही नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करत गोळीबार सुरु केला. तर जवानांनी त्यांना प्रतिउत्तर देत दोन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडे एसएलआर रायफल, एफ 303 रायफल, एक 12 बोर रायफल आणि काही काडतुसे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत.

तर रायपूर येथून 200 किमी अंतरावरील एका गावात नक्षलवाद्यांची सभा बोलावण्यात आली होती. या सभेला बऱ्याच नक्षलवाद्यांनी उपस्थिती लावली होती. परंतु याबद्दल पोलिसांच्या पथकाला माहिती मिळताच सापळा रचून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. तर दोन गटात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार मारले गेले आहेत.