Chandigarh Girls Hostel MMS: विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठातील एमएमएस Video मुळे हादरले पंजाब, विद्यार्थ्यांची निदर्शने

असाही दावा केला जातो आहे की, विद्यापीठातीलच वसतिगृहातीलच एका मुलीने 5 ते 6 विद्यार्थीनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो आपल्या ओळखीच्या मुलाला पाठवला. या मुलाने पुढे तो व्हायरल केला.

Chandigarh University Protest. (Photo Credits: ANI)

Mohali Students MMS: चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh Girls Hostel MMS) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर पंजाब हादरले आहे. प्राप्त माहितीनुसार, मोहालीतील एका खासगी विद्यापीठात मध्यरात्रीपासून सुरु झालेला गोंधळ सकाळपर्यंत सुरुच होता.विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थीनींचा आरोप आहे की, बाथरुममध्ये अंघोळ करताना त्यांचा कोणीतरी व्हिडिओ चित्रीत केला आणि तो लीक केला. असाही दावा केला जातो आहे की, विद्यापीठातीलच वसतिगृहातीलच एका मुलीने 5 ते 6 विद्यार्थीनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो आपल्या ओळखीच्या मुलाला पाठवला. या मुलाने पुढे तो व्हायरल केला. दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलींपैकी काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र, पंजाब पोलिसांनी ते फेटाळले आहे.

चंदिगड विद्यापीठ एमएमएस प्रकरणात आतापर्यंत आत्महत्येचा कोणताही प्रयत्न झाला नाही. विद्यार्थ्यीनींचे कथीत नग्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत, अशी माहिती मोहालीच्या एसएसपींनी दिली आहे.

विद्यार्थीनिंचा व्हिडिओ लिक झाल्याचे कळताच विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. विद्यापीठ प्रशासनाने घटनेची दखल घेतली आहे. परंतू, ते विद्यार्थ्यांची निदर्शने दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यानंतर एमएमएस करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. (हेही वाचा, Chandigarh Girls Hostel MMS: चंदिगड विद्यापीठात एमएमएस कांड, 60 मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल, तीव्र आंदोलनानंतर महिला आरोपी ताब्यात)

ट्विट

पोलिसांनी या मुलीविरुद्ध एफआयआरही नोंदवला आहे. ही मुलगी बऱ्याच दिवसांपासून मुलींना अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती. या तरुणाने हे व्हिडिओ इंटरनेटवर टाकले होते जे व्हायरल झाले . जेव्हा मुलींनी इंटरनेटवर त्यांचे व्हिडिओ पाहिले तेव्हा त्या चक्रावून गेल्या, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

दरम्यान, विद्यापीठ व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपल्याचा आरोपही केला जात आहे. याबाबत त्यांनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. मात्र, व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी काल रात्री विद्यापीठाचा घेराव करून घोषणाबाजी केली. प्रशासनाने हा गोंधळ पाहून या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन घटनास्थळी पाचारण केले.

दरम्यान, आक्रमक विद्यार्थ्यांचा हा गोंधळ एवढा वाढला की सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केले. पोलीस दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांची पीसीआर व्हॅन उलटवली आणि पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीमार करावा लागला. सध्या पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, ज्या मुलाला हे व्हिडीओ पाठवले आहेत त्यालाही अटक केली जाईल. विद्यार्थिनींचे व्हिडिओ इंटरनेटवरून हटवण्यासाठी पंजाब सरकार आणि पोलिसांनी कारवाई केली असून सायबर सेलची मदत घेतली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif