Central Vista Bhumi Puja Live Streaming on DD News: PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचे भूमिपूजन; इथे पहा या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग

दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि पायाभरणी केली जाईल.

Proposed Model of Central Vista (Photo Credits: ANI)

Central Vista project अंतर्गत आज नव्या संसद भवनाचे दिल्लीमध्ये भूमीपूजन आणि पायाभरणीचा सोहळा होणार आहे. दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि पायाभरणी केली जाईल. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा सोहळा सुरू होणार असून काही राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल देखील या सोहळ्याला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. दरम्यान 12.55 ला कार्यक्रम सुरू होणार असून 1 वाजता पायाभरणी होईल. त्यानंतर दीडच्या सुमारास सर्व धर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं आहे. New Parliament House: नव्या संसद भवनात खासदारांसाठी 1 हजार 350 आसन व्यवस्था; जाणून घ्या प्रकल्पाविषयी खास गोष्टी.

सध्याच्या संसद भवनाजवळच नवं चार मजली संसद भवन उभारलं जाणार आहे. 2022 पर्यंत त्याच काम पूर्ण होणार असून यासाठी 971 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान मागील आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायलयाने या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या कामाला तूर्तास ब्रेक लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भूमीपुजन आणि पायाभरणी सोहळ्याला हिरवा कंदिल होता.

इथे पहा डीडी वर सोहळा

नव्या संसद भवनच्या निर्माणासाठी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू सोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राज्यसभेत आणि लोकसभेत 5 ऑगस्ट 2019 मध्ये हा प्रस्ताव मांडला होता. नव्या संसद भवनामध्ये 1224 खासदार एकसाथ बसू शकतात आणि सध्याच्या श्रम शक्ती भवन मध्ये दोन्ही सदनाच्या खासदारांच्या कार्यालयांची निर्मिती केली जाणार आहे.