7th Pay Commission Latest DA News: केंद्रीय कर्मचार्‍यांना जुलै महिन्यात 3% डीए वाढ मिळण्याची शक्यता; रिपोर्ट्स

एकूण वाढ पाहता ती 28% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Money | Representative Image (Photo Credits: Pixabay)

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार (7th Pay Commission) पगार मिळणार्‍या भारत सरकारच्या केंद्रीय कर्मचार्‍यांना जुलै (July) महिन्यात 3% डीए वाढ (DA Hike)  मिळण्याची शक्यता आहे. All India Consumer Price Index ने जारी केलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे महिन्यासाठी महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ होण्याची शक्यता आहे. असा डीएनए चा रिपोर्ट आहे. अद्याप सरकारकडून यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी वर्षातून दोनदा डीए वाढ जाहीर केली जाते. जानेवारी आणि जुलै महिन्यात ही नियमित डीए वाढ होते. दरम्यान यंदा जुलै महिन्यात मागील सहा महिन्यांचा महागाईचा दर पाहून डीए मधील वाढ ठरवली जाते पण सध्याचा डाटा पाहता तो 3% पेक्षा अधिक असू शकत नाही असे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. (नक्की वाचा: 7th Pay Commission: DA आणि DR Arrears बद्दल सोशल मीडियात व्हायरल होणारे पत्रक खोटे, अर्थमंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण).

सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17% आहे. जुलै 2019 पासून तो लागू आहे. मागील 4% वाढ जाहीर करून तो 21% करण्यात आला होता. जानेवारी 2020 पासून तो लागू होणं अपेक्षित आहे. जून 2020 मध्ये पुन्हा 3% वाढ आणि जानेवारी 2021 मध्ये 4% डीए वाढ आहे. पण कोरोना संकटामुळे सरकार कडून ही वाढ फ्रीझ करण्यात आली आहे. एकूण गणित पाहता आता सरकारी कर्मचार्‍यांचा डीए 28% होऊ शकतो.

भारत सरकार कडून कर्मचार्‍यांचा 3 हप्तांमधील डीए फ्रीझ करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यात सरकार हे फ्रीझ केलेले हफ्ते पुन्हा सुरळीत करून कर्मचार्‍यांना सारी रक्कम देण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर 2021 पासून हे हफ्ते सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.