सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल; CAA ला विरोध करत चिथावणीखोर भाषण करण्याचा आरोप

Case Filed Against Sonia Gandhi, Priyanka Gandhi and Asaduddin Owaisi: काँग्रेस हाय कमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi), महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sonia Gandhi, Priyanka Gandhi and Asaduddin Owaisi (Photo Credits: PTI)

Case Filed Against Sonia Gandhi, Priyanka Gandhi and Asaduddin Owaisi: काँग्रेस हाय कमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi), महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी  (Asaduddin Owaisi) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा उत्तर प्रदेशमधील अलीगड मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.  सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि असदुद्दीन ओवैसी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Oppose to CAA) चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप वकील प्रदीप गुप्ता यांनी केला आहे. आणि याच संधर्भात त्यांनी तिन्ही नेत्यानाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मेरठमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात चारजणांचा मृत्यू झाला. आणि त्यांच्याच कुटुंबियांना भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जात होते. मात्र, मेरठच्या बॉर्डरवर पोलिसांनी थांबवलं होतं. तसेच मेरठ शहरात सध्या कलम 144 लागू आहे, असं सांगत पोलिसांनी त्या दोन्ही नेत्यांना सांगून परत जाण्यास सांगितलं. अखेर त्यांना दिल्लीला पुन्हा परतावं लागलं.

CAA Protest: सुधारित नागरिकत्व या काळ्या कायद्याला विरोध असणाऱ्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकावा - असदुद्दीन ओवैसी

तर दुसरीकडे 23 डिसेंबर (सोमवारी) रोजी चेन्नई शहारत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Protests against CAA) रॅली काढण्या आली होती. त्याविरोधात डीएमके पक्षप्रमुख एमके स्टाली यांच्यासह आठ हजार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मोर्चा काढण्यासाठी पोलिसांच्या परवानगी न घेतल्याचा  आरोप असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now