Mumbai News: मुंबईत व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह 15 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील व्यवसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह १५ जणांना अटक करण्यात आले आहे,

Representational Picture (photo credit- File image)

Mumbai News: मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी काल शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि इतरांविरुद्ध गोरेगाव पूर्व भागातील व्यापारी राजकुमार सिंग यांचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला. पोलिसांनी राज सुर्वेसह 5 आरोपींची नावे दिली असून 10-12 अज्ञात आरोपींचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. गोरेगावस्थित 'ग्लोबल म्युझिक जंक्शन' या कंपनीच्या कार्यालयात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. बुधवारी दुपारी ग्लोबल म्युझिक जंक्शनच्या कार्यालयात 10 ते 15 जण आले आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार सिंग यांना मारहाण करून बंदुकीच्या धाकावर त्यांचे अपहरण केल्याची माहिती मिळाली. राजकिय क्षेत्रात खळबळ उडाल्याने शिंदे गटातील नेत्या शितल म्हात्रे यांनी या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे.