Pakistani Drones: सीमा पोलीस दलाने 2023 मध्ये 100 पाकिस्तानी ड्रोन पाडले

सीमा सुरक्षा दलाने (BSF) मंगळवारी संगितले की, त्यांनी भारतीय हद्दीत अंमली पदार्थ, शस्त्रे आणि दारूगोळा तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशविरोधी घटकांनी तैनात केलेले 100 पाकिस्तानी ड्रोन यशस्वीरित्या रोखले आणि निष्क्रीय केले.

Drone | Representational Image (Photo Credits: Pixabay)

BSF Shoots Down Pakistan Drone: सीमा सुरक्षा दलाने (BSF) मंगळवारी संगितले की, त्यांनी भारतीय हद्दीत अंमली पदार्थ, शस्त्रे आणि दारूगोळा तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशविरोधी घटकांनी तैनात केलेले 100 पाकिस्तानी ड्रोन यशस्वीरित्या रोखले आणि निष्क्रीय केले. पंजाब सीमेवर कार्यरत असलेल्या बीएसएफने, ड्रोन-चालित तस्करी ऑपरेशन्स सुलभ करण्यात गुंतलेल्या तस्करांच्या अटकेसह, बेकायदेशीर कृत्यांचा सामना करण्यासाठी तीन-पक्षीय धोरणाची रूपरेषा आखून ही कारवाई केली.

बीएसएफची कामगिरी:

बीएसएफ पंजाब फ्रंटियरने माहिती देताना म्हटले आहे की, 2023 मध्ये बीएसएफ आतापर्यंत भारताच्या हद्दीत अंमली पदार्थ, शस्त्रे आणि दारूगोळा तस्करी करण्यासाठी देशविरोधी घटकांकडून वापरण्यात येणारे 100 पाकिस्तानी ड्रोन यशस्वीरित्या पाडले किंवा जप्त केले आहेत. फोर्सने केवळ ड्रोन निष्प्रभावीच नाही तर बेकायदेशीर कृतींना मदत करणार्‍या व्यक्तींना पकडण्याचीही कामगिरी कली आहे. (हेही वाचा, Blood Delivered By Drone: भारतामध्ये पहिल्यांदा ड्रोन द्वारा झाली रक्ताच्या पॅकेटची डिलेव्हरी (Watch Video))

त्रिस्तरीय रणनीती:

अंमली पदार्थांचा पुरवठा रोखणे, अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना रचनात्मक सहभागासाठी कौशल्याद्वारे सशक्त करणे, याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही रणनिती बीएसएफने आखली. ज्याचा सकारात्मक परिणाम सीमाभागात पाहायला मिळाला. सोमवारी नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, बीएसएफने अमृतसरमध्ये ड्रोनद्वारे तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच चिकट टेपने गुंडाळलेले 434 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. सैन्याने ड्रोनच्या घुसखोरीला त्वरेने प्रत्युत्तर दिले, ड्रोनने टाकलेला अवैध पदार्थ परत मिळवला, जो नंतर पाकिस्तानी हवाई हद्दीत निघून गेला.

BSF ने बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी आणि भारतीय सीमेची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर जोर दिला. ड्रोनद्वारे ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची घुसखोरी करण्याचा तस्करांचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपल्या सैन्याची सतर्कता कायम ठेवली असल्याचेही बीएसएफने म्हटले आहे.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) हे भारतातील सीमा गस्त दल आणि केंद्रीय पोलीस दल (CPF) आहे. हे जगातील सर्वात मोठे सीमा रक्षक दल म्हणूनही ओळखले जाते. ते भारताच्या पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमारच्या सीमेवर गस्त घालण्यासाठी तौनात आहे. बीएसएफच्या कर्तव्यांमध्ये पाळत ठेवणे आणि लोक आणि वस्तूंचा अनधिकृत प्रवेश आणि बाहेर जाणे प्रतिबंधित करणे समाविष्ट आहे. बीएसएफची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी 1965 च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाली. हे गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे आणि यामध्ये सुमारे 186 बटालियन आणि 200,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. बीएसएफकडे हवाई शाखा, सागरी शाखा, कमांडो युनिट्स आणि आर्टिलरी रेजिमेंट्स देखील आहेत.