Jammu Blast: जम्मू सिटी बस स्टॅन्ड परिसरात बसमध्ये बॉम्बब्लास्ट, 18 जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
सुरक्षारक्षकांनी बॉम्बब्लास्ट झालेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवली असून याबाबतच अधिक तपास सुरू आहे.
जम्मू कश्मिर (Jammu Kashmir) येथे जम्मू सिटी बस स्टॅन्ड परिसरात आज ( 7 मार्च ) रोजी बॉम्ब ब्लास्ट झाल्याचे वृत्त आहे. या बॉम्बब्लास्टमधील जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा ग्रेनेड ब्लास्ट असून जम्मू बस स्टॅन्डजवळ उभ्या असलेल्या बसमध्ये ब्लास्ट झाला आहे. ही बस जम्मू हून दिल्लीकडे (Jammu - Delhi) जाणारी होती. प्राथमिक माहितीनुसार या ब्लास्टमध्ये 18 जण जखमी झाले आहेत. सुरक्षारक्षकांनी बॉम्बब्लास्ट (Bomb Blast) झालेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवली असून याबाबतच अधिक तपास सुरू आहे. हा ब्लास्ट नेमका कशामुळे झाला? कोणी घडवून आणला? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
जम्मूचे IGP एम के सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू स्टॅन्डजवळ झालेला ब्लास्ट हा ग्रेनेड हल्ला असून 18 प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
14 फेब्रुवारीला जैश ए मोहम्मदने सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर हल्ला केला. यामध्ये 42 हून अधिक जवान जागीच ठार झाले. त्यानंतर भारताकडून पाकव्याप्त काश्मिरमध्ये एअरस्ट्राईक करण्यात आला. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.