Bharat Jodo Nyay Yatra: आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राडा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला
ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 14 जानेवारी रोजी मणिपूर राज्यातून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरूवात केली. त्यानंतर 18 जानेवारी रोजी यात्रेचा आसाम राज्यात प्रवेश झाला.आसाम सरकारचा या यात्रेला विरोध असल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जात आहे. आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान कॉंग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल (Video Viral) होत आहे.
पाहा पोस्ट -
काँग्रेसचे संवाद विभागाचे प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी म्हटले की, आसामच्या सुनीतपूर भागातील जमुगुरीघाट येथून प्रवास करत असताना भाजपा समर्थकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हिडिओ आता काँग्रेसच्या वतीने सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. भाजपाचे झेंडे हाती धरलेल्या एका अनियंत्रित जमावाने माझ्या गाडीला घेरले. त्यांनी गाडीला लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर फाडून टाकले.
भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये प्रवेश करत होती, तेव्हा मुख्यमंत्री सर्मा यांनी काँग्रेसवर टीका केली होती. “गांधी कुटुंब हे या देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. तसेच ही त्यांची न्याय यात्रा नसून मियाँ यात्रा आहे. जिथे जिथे मुस्लीम समुदाय आहे, त्या त्या ठिकाणी ते भेटी देतात”, अशी टीका मुख्यमंत्री सर्मा यांनी केली होती.