BJP MLA Cross Voting: दे धक्का! भाजप आमदाराकडून विरोधात मतदान; कर्नाटकमध्ये राज्यसभा निवडणूक चर्चेत

राजकीयदृष्ट्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या आणि इतर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडी करण्यात अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणूक 2024 साठी सुरु असलेल्या मतदानादरम्यान भाजप (BJP) आमदाराने विरोधात मतदान केले आहे.

BJP MLA Cross Voting: दे धक्का! भाजप आमदाराकडून विरोधात मतदान; कर्नाटकमध्ये राज्यसभा निवडणूक चर्चेत
ST Somashekhar | (Photo Credits: ANI)

BJP MLA ST Somashekhar Cross Voting: राजकीयदृष्ट्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या आणि इतर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडी करण्यात अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणूक 2024 साठी सुरु असलेल्या मतदानादरम्यान भाजप (BJP) आमदाराने विरोधात मतदान केले आहे. आमदार एसटी सोमशेखर ( ST Somashekhar) यांनी भाजप विरोधात मतदान केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ते बंगळुरु येथील यशवंतपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. एसटीएस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आमदार महोदयांनी पक्षाच्या विरोधात जात काँग्रेसला मतदान केल्याची माहिती आहे.

भाजप प्रतोदांकडून व्हिप उल्लंघनाची पुष्टी

कर्नाटकमध्ये राज्यसभा निवडणूक 2024 दरम्यान भाजपमध्ये क्रॉस व्होटींग झाल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेतील भाजपचे मुख्य व्हिप, दोड्डानगौडा जी. पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. क्रॉस व्होटींग झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ते पुढे म्हणाले की, क्रॉस व्होटिंग केल्याची पुष्टी झाली आहे. काय करता येईल आणि काय कारवाई करावी यावर आम्ही चर्चा करत आहोत. दरम्यान, त्यांनी नेमक्या कोणत्या आमदाराने विरोधात मतदान केले याबाबत नावाची पुष्टी केली नाही. (हेही वाचा, Bhai Jagtap: विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर हायकमांडने कडक कारवाई करावी - भाई जगताप)

पक्षादेश झुगारत भाजपमध्ये क्रॉस व्होटींग

राज्यसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या 66 आमदारांना एक दिवस आधी व्हीप जारी केला होता. त्यांना आज (27 फेब्रुवारी, मंगळवार) मतदानानंतर आमदारांना मुख्य व्हीपच्या कार्यालयात येण्यास सांगण्यात आले. मात्र एसटी सोमशेखर यांनी व्हिपचे उल्लंघन करत काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. एसटीएसच्या या निर्णयावर भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Cross Voting: 'क्रॉस व्होटिंग'प्रकरणी कुलदीप बिश्नोईवर मोठी कारवाई, काँग्रेसने दाखवला बाहेरचा रस्ता)

एस.टी.सोमशेखर यांची प्रतिक्रिया

मतदानानंतर बोलताना एस.टी.सोमशेखर म्हणाले की, ज्यांनी अनुदानाचे आश्वासन दिले होते, त्यांना प्रामाणिकपणे मतदान केले. सीएम सिद्धरामय्या यांनी याबाबत बोलताना म्हटले की, मी काँग्रेसला मतदान केल्याबद्दल एसटीएस अभिनंदन करतो.

एक्स पोस्ट

दरम्यान, एस टी सोमशेखर यांनी भाजपविरोधात केलेल्या मतदानाची पक्षश्रेष्ठींकडून जोरदार दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस सरकार आहे. तत्पूर्वी या राज्यात भाजप सरकार होते. मात्र, मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारचा पराभव करत काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता दिली. राज्यातील सत्ता हातातून गेल्याने कर्नाटक भाजप आगोदरच गर्भगळीत झाला आहे. त्यामुळे विधानसभेत निवडूण आलेल्या आमदारांची संख्या कायम ठेवण्याचे आणि त्यांना सांभाळण्याची कसरत भाजप करत आहे. असे असतानाच राज्यसभा निवडणुकीत आमदाराने विरोधात मतदान केल्याची घटना पुढेआली आहे. यापार्श्वभूमीवर संघटात्मक शिस्त म्हणून भाजप टोकाची कारवाई सदर आमदारांवर करु शकतो, अशी चर्चा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us