BJP Membership Campaign: भाजप सदस्यत्व मोहिमेने रचला इतिहास, 3 दिवसात 1 कोटीचा आकडा पार- विनोद तावडे
विनोद तावडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हणाले, "भाजप सदस्यत्व मोहिमेने इतिहास रचला, 3 दिवसात 1 कोटीचा आकडा पार केला." तावडे पुढे म्हणाले, "2 सप्टेंबरपासून सुरू झालेला संघ पर्व सदस्यत्व अभियान-2024 मध्ये अवघ्या 3 दिवसांत 1 कोटींहून अधिक सदस्य सामील झाले आहेत, हा एक विक्रमच आहे.
येथे पोस्ट पहा:
भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचे नविनीकरण केले. नड्डा यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. त्यासोबत त्यांनी लिहिले की, "भारतीय जनता पार्टी-राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाअंतर्गत सदस्यत्वाच्या नविनीकरणाची प्रत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आम्हा सर्वांचे जेष्ठ असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी दिली.