IPL Auction 2025 Live

'BJP' च्या 40व्या वर्धापन दिनाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट; भाजप स्थापना दिवसाच्या सर्व कार्यकर्त्याना दिल्या शुभेच्छा

या खास दिवसाचे औचित्य साधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्याना शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे.

Prime Minister Narendra Modi. (Photo Credits: PTI)

देशातील सद्य घडीचा सर्वात मोठा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा (BJP) आज 40 वा वर्धापन दिन आहे. 6 एप्रिल 1980 रोजी अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpeyi) , लाल कृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani), यांच्या हस्ते भाजप ची स्थापना झाली होती. या खास दिवसाचे औचित्य साधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्याना शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे. मोदींनी आपल्या ट्विट मधून भाजपच्या सर्व दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहत तुमच्यामुळेच आज भाजपला देशाच्या कोट्यवधी जनतेची सेवा करण्याची संधी मिळत आहे अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच अन्य एका ट्विट मधून मोदींनी "जेव्हा किंवा संधी मिळाली तेव्हा पक्षाने गरिबांचे सबलीकरण आणि सुशासन या मुद्द्यांवर भर दिला आहे, लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणणे हे ध्येय पक्ष व कार्यकर्त्यांंनी जपत समाजात एक उत्तम उदाहरण रचले आहे असे म्हंटले.  दुसरीकडे  भाजप स्थापन दिवसाच्या निमित्त आज ट्विटर वर सुद्धा BJPAT40 असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देतानाच आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या कोव्हीड १९ च्या संकटकाळात आपला आनंद साजरा करताना भान ठेवा असेही आवाहन केले आहे. यासाठी भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी खास नियमावली जारी केली असून त्यात कार्यकर्त्यांनी काय करावे व करू नये याबाबत स्पष्टीकरण दिले आहे, मोदींनी सुद्धा हीच सूचना आपल्या ट्विट मधून शेअर करत जे पी नड्डा यांच्या सूचनांचे पालन करा असे सांगितले आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा पाया पाहायला गेल्यास भाजप हा जनसंघ या 1951 साली स्थापन झालेल्या पक्षाचा सुधारित चेहरा आहे असे दिसून येते. 1951 साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली त्यांच्या निधनानंतर दीनदयाल उपाध्याय ,अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. पुढे 1977 साली जनसंघाने भारतीय लोकदल, कॉंग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. व 1980 साली या जनता पक्षाचे विघटीकरण होऊन भाजप ची स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.