Biryani in West Bengal: बिर्याणी खाल्ल्यास पुरुषांचे पौरुषत्व धोक्यात? बिर्याणी व्रिकेत्याचं शटर डाऊन

एवढचं नाही तर या प्रकरणी बिर्याणी विकणारी दोन हॉटेल्स सुध्दा बंद करण्यात आली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बिर्याणी (Biryani) ही भारतात (India) मासाहरी आहार (Non Vegetarian) घेणाऱ्यांची आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar), दिल्ली (Delhi) या भागात तर बिर्याणीची विशेष क्रेझ (Craze) दिसून येते. पण तुम्हीही जर बिर्याणी लव्हर (Biryani Lover) असला तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण बिर्याणी खाल्ल्यास पुरुषांचे पौरुषत्व कमी होतं असा अजब दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. एवढचं नाही तर बिर्याणी विकणारी दोन हॉटेल्स सुध्दा बंद करण्यात आली. बिर्याणी बंदीचा हा अजब प्रकार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) घडला आहे. प. बंगालमधील कूचबिहार (Kuchbihar) शहरात हा प्रकार घडला असुन कूचबिहार नगरपालिकेचे अध्यक्ष आणि तृणमूल नेते रवींद्रनाथ घोष (Rabindranath Ghosh) यांच्या नेतृत्वाखाली ही अजब मोहीम राबवण्यात आली आहे.

 

पश्चिम बंगालमधील (West Bengal) कूचबिहार (Kuchbihar)  शहरात काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहार (Bihar) राज्यातून हॉटेल व्यवसायिक स्थलांतरीत (Migration) झाले. तरी कूचबिहारमध्ये ते आपलं हॉटेल (Hotel) चालवू लागले. या हॉटेलमध्ये ते बिर्याणी विक्रीचा व्यवसाय करत होते. मोठ्या संख्येने ग्राहक देखील त्यांच्या हॉटेमधील बिर्याणीचा (Biryani) आस्वाद घेण्यास येवू लागले पण बिर्याणी खाणाऱ्या ग्राहकास काही अजब अडचणी येवू लागल्या. (हे ही वाचा:- Crime: शुल्लक कारणांवरून दोन मित्रांमध्ये झाला वाद, बदला घेण्याच्या भावनेने चार वर्षाच्या चिमुकल्याची केली हत्या)

 

गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील लोकांकडून तक्रारी येत होत्या की, या दुकानांमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी माहित नाही कोणते मसाले वापरले जात आहेत, ज्यामुळे पुरुषांचं पौरुषत्व क्षीण होत आहे. तरी कूचबिहार येथील तृणमूल नेते रवींद्रनाथ घोष (Rabindranath Ghosh) यांनी धडक कारवाई करत  हॉटेलसह हॉटेलमालकाची तपासणी केली. तर दुकानांकडे व्यापार परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही दुकानं बंद करण्यात आली आहेत.