Chennai Woman Techie Burnt Alive: आगोदर लिंग बदलले मग वर्गमित्राने सॉफ्टवेअर इंजिनियरला जिवंत जाळले

नंतरत तिला कोंडून तिच्यावर ब्लेडने वार केले आणि तिला जिवंत जाळले (Chennai Woman Techie Burnt Alive). ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. चेन्नईच्या उपनगरातील केलंबक्कमजवळील थलंबूरमध्ये ही भीषण घटना उघडकीस आली

Burnt | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Chennai Woman Techie Murder: तामिळनाडू येथील एक 24 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणी माजी वर्गमित्राने केलेल्या भयानक हल्ल्याला बळी पडली. ही घटना पीडितेच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला घडली. धक्कादायक असे की, आरोपीने पीडितेसोबत संबंध ठेवता यावेत यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. त्याने पीडितेला सरप्राईज देण्यासाच्यानावाखाली एकांतात बोलावले. नंतरत तिला कोंडून तिच्यावर ब्लेडने वार केले आणि तिला जिवंत जाळले (Chennai Woman Techie Burnt Alive). ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. चेन्नईच्या उपनगरातील केलंबक्कमजवळील थलंबूरमध्ये ही भीषण घटना उघडकीस आली. आर नंदिनी असे पीडितेचे नाव आहे. तर वेत्रीमारन (वय-26) असे आरोपीचे नाव आहे. ज्याला पांडी माहेश्वरी असेही म्हणतात.

नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधून क्रूरकर्म

पोलिसांनी दिलेली माहिती अतीशय धक्कादायक आहे, पोलिसांनी म्हटले आहे की, 26 वर्षीय वेत्रिमरण उर्फ पांडी माहेश्वरी याने वाढदिवसाच्या सरप्राईजच्या नावाखाली, 24 वर्षीय आर नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर त्याने तिच्या हाताला चेन बांधली आणि मग नंतर तिच्यावर ब्लेडणे वार केले आणि तिला पेट्रोल ओतून जाळले. मूळची मदुराईची राहणारी आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली संशयित पीडित तरुणी चेन्नईत नातेवाईकांकडे राहत होती. वेत्रीमारनने पंडी माहेश्वरी हे नाव बदलून वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने नंदिनीला आपल्या प्राणघातक सापळ्यात अडकवले. तांबरमचे पोलिस आयुक्त अमलराज यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, ते मित्र होते आणि चेन्नईत एकत्र राहत होते. कोणत्याही लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान, वेत्रीमारन यापूर्वी हिंसक कृतीशी रमलाहोता किंवा नाही हे स्पष्ट नाही. (हेही वाचा, Pune Crime News: पत्नीच्या छातीवर बुक्क्यांचा प्रहार, जेवण न दिल्याने हत्या; पतीकडून कृत्य)

वाढदिवसाची सायंकाळ भयावह वास्तवात बदलली

प्रदीर्घ काळ एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर दोघांच्या नात्यात काहीसा दुरावा आला होता. मदुराईमध्ये एकत्र शिक्षण घेतल्यानंतर, नंदिनीने वेत्रीमारनचे लिंग बदलाचे ऑपरेशन करूनही मैत्री सुरू ठेवली. या दोघांनी थोराईपक्कम येथील एका खाजगी आयटी फर्ममध्ये एकत्र काम केले होते आणि त्यांचे आयुष्य परस्परांशी जोडले होते, असे पोलिसांनी सांगितले. वेत्रीमारनने नंधिनीला वाढदिवसाचे सरप्राईज म्हणून आमंत्रित केले होते. परंतू ती संध्याकाळ 24 वर्षांच्या मुलासाठी भयानक वास्तवात बदलली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशांनी साखळीने बांधलेल्या आणि जळत असलेल्या नंदिनीला मदत केली. आग विझवली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी त्वरीत वेत्रीमारनला पकडले, ज्यांच्यावर आता हत्येचा आरोप आहे आणि त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.