Bilawal Bhutto About PM Modi: पाकिस्तानने ओलांडल्या सगळ्या सीमा, पंतप्रधान मोदींची थेट दहशतवादी ओसामा बिन लादेनशी तुलना

संयुक्त राष्ट्र परिषदेत भुट्टो म्हणाले, ओसामाबीन लादेन तर मारल्या गेला पण गुजरातचा कसाई मात्र अजूनही जिवंत आहे आणि तो कसाई आज भारताचा पंतप्रधान आहे.

भारत-पाकिस्तान वाद चांगलाचं तापल्याचं चिन्ह आहे. कारण यावेळी पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्र परिषदेत सर्वां देखत भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट दहशतवादी ओसामाबीन लादेनशी केली आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या या वक्तव्याचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानावर प्रतिक्रीया देताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या बाबत विचित्र वक्तव्य केलं आहे.  संयुक्त राष्ट्र परिषदेत भुट्टो म्हणाले, ओसामाबीन लादेन तर मारल्या गेला पण गुजरातचा कसाई मात्र अजूनही जिवंत आहे आणि तो कसाई आज भारताचा पंतप्रधान आहे. भुट्टोंच्या या वक्तव्याचा देशात जोरदार निषेध नोंदवण्यात आला असुन संयुक्त राष्ट्र परिषदेसारख्या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमात कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाबाबत या प्रकारचं वक्तव्य करणं निंदनीय आहे.

 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून भुट्टो यांच्या या वक्तव्याबाबत थेट पत्रक काढत बलावल भुट्टोंच्या पंतप्रधान मोदी विरोधी या वक्तव्यास असंस्कृत म्हण्टले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत दहशवादी हल्ले, लोकांनी भोगलेल्या यातनांपेक्षा पाकिस्तानला स्वतची प्रतिमा स्वच्छ करण्यात अधिक रुची होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्वतची निराशा भारताचे पंतप्रधान मोदींवर काढण्या ऐवजी स्वतचा देश म्हणजेचं पाकिस्तानातील दहशतवाद्या पुढे दर्शवावी. म्हणजेचं पाकिस्तानात दिवसेनदिवस वाढत असलेल्या दहशतवाद ताब्यात आणण्यास मदत होईल. पाकिस्तानने भारतावर भाष्य करण्यापुर्वी स्वत:ची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असं पत्रक काढत भआरताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताची निंदा केली आहे. (हे ही वाचा:- EAM S Jaishankar Again Hits Hard At Pakistan: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सलग दुसऱ्या दिवशी फाडला पाकिस्तानचा बुरखा, अमेरिकेलाही घेतले सोबत)

 

केंद्र सरकारमधील विविध मंत्र्यानी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री  बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा निषेध नोदवला आहे. तर भाजपच्या  कार्यकर्त्यांनी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल भुट्टोंनी केलेल्या वक्तव्या विरोधात निदर्शने केली. भुट्टोच्या या वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम फक्त भारताचं नाही तर संपूर्ण जगात उमटताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाची तुलना थेट दहशतवाद्याशी करण चुकीचं असल्याच्या विविध प्रतिक्रीय येत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif