Bihar Shocker: मित्रांमध्ये लागलेली पैज जिंकण्यासाठी खाल्ले 150 मोमोज; 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

खूप मोमोज खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू झाला. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

बिहारच्या (Bihar) गोपालगंजमध्ये (Gopalganj) मोमोज (Momos) खाण्यावरून मित्रांमध्ये लागलेल्या पैजेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मित्रांमध्ये जास्तीत जास्त मोमोज खाण्याची पैज होती. ही पैज जिंकण्यासाठी तरुणाने सुमारे दीडशे मोमो खाल्ले व यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, मृताच्या वडिलांनी त्याच्या मित्रांवर आपल्या मुलाची विष पाजून हत्या केल्याचा आरोप केला आहे. ही घटना गुरुवार (13 जुलै 2023) आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत तरुण गोपालगंज जिल्ह्यातील थावे पोलीस स्टेशन हद्दीतील सिहोरवा गावचा रहिवासी आहे. विपिन कुमार पासवान असे त्याचे नाव आहे. तो मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवत होता. घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारीही तो आपल्या दुकानात काम करत होता. यावेळी त्याचे काही मित्र दुकानात आले. तिथे मित्रांमध्ये अधिक मोमोज खाण्यासाठी पैज लागली. यानंतर विपिन आपल्या मित्रांसह मोमोजच्या दुकानात पोहोचला. जिथे त्याने जवळपास 150 मोमो खाल्ले.

यानंतर तो पुन्हा आपल्या दुकानात आला. जिथे तो काही वेळाने बेशुद्ध पडला. विपिन बेशुद्ध असल्याचे पाहून त्याला तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर मृत विपिनचे वडील विशुन यांनी त्याच्या मित्रांवर खुनाचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, दोन मुले दुकानात आली आणि त्यांच्या मुलाला घेऊन गेली. यानंतर त्यांनी विष देऊन विपिनची हत्या केली. (हेही वाचा: Delhi Shocking: दिल्लीतील मुकुंदपूरमध्ये पुराच्या पाण्यात आंघोळ करताना 3 मुलांचा बुडून मृत्यू)

या घटनेबाबत ठावे पोलीस स्टेशनचे प्रभारी शशी रंजन कुमार सांगतात की, मित्रांमध्ये मोमोज खाण्यासाठी पैज लागली होती. खूप मोमोज खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू झाला. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. या प्रकरणी सदर हॉस्पिटलचे डॉ. एसके रंजन यांनी सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर मोमोज नीट चावून न खाल्ल्यानेही मृत्यू होऊ शकतो. मोमोज नीट न चावता सरळ गिळले तर, तो घशात अडकू शकतो.