राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याविरोधात FIR दाखल; 'बात बिहार की' कॅम्पेन ची माहिती चोरल्याचा आरोप
त्यानंतर जेडीयू पक्षामधून नितीश कुमार यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Political Strategist Prashant Kishor) यांच्या विरोधात पाटलीपुत्र पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाश्वत गौतम (Shashwat Gautam) याने 'बात बिहार की' (Baat Bihar Ki) या कॅम्पेनची चोरी केल्याचा (Plagiarism) आरोप त्यांच्यावर केला आहे. दरम्यान यामध्ये प्रशांत किशोर यांच्या विरोधात कलम 420, 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्याशी तीव्र मतभेद झाले होते. त्यानंतर जेडीयू पक्षामधून नितीश कुमार यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे.
शाश्वत गौतम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रशांत किशोर यांनी माझी बौद्धिक संपदा चोरली आहे. मला एक कल्पना सुचली होती त्यावर मी काम करत होतो. ही आयडिया 'बात बिहार की' बाबतची होती. या प्रोजेक्टवर काम करताना त्यांनी 7 जानेवारी दिवशी त्याचं रजिस्ट्रेशन देखील केलं होतं. त्यावेळेस ओसामा नावाची व्यक्ती त्यांच्यासोबत काम करत होती. त्याच्याकडे शाश्वत यांचा लॅपटॉप होता. दरम्यान यावेळेस डाटा चोरी झाली असू शकते असा दावा शाश्वत गौतम यांनी केला आहे. प्रशांत किशोर यांना लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांच्याकडून ऑफर म्हणाले 'जेडीयूत या! तुमच्यासाठी पक्षाची दारे खुली'
ANI Tweet
शाश्वत गौतम हे बिहार मधील चंपारण्यच्या चैता गावातील रहिवासी होते. ते पेशाने आहेत. मागील काही वर्ष ते अमेरिकेत वास्तव्यास होते. 2011 साली वॉशिंग्तन डीसी येथे त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. पुढे जॉर्ज वॉशिंगटन यूनिवर्सिटी मध्ये 2012 साली विद्यार्थी संघाच्या निवडणूकीमध्ये ते जिंकले. तर महाराष्ट्रामध्येही काही महिन्यांपूर्वी सत्तापेचातून निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्यासाठी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर त्यांनी भेट घेतली होती.