सुशांत सिंह हा राजपूत नव्हे, महाराणा प्रताप यांचा वंशज आत्महत्या करु शकत नाही; आरजेडी आमदार अरुण यादव यांचे वादग्रस्त विधान (Watch Video)
अशातच आरजेडी आमदार अरुण यादव (RJD MLA Arun Yadav) यांंनी सुशांंतच्या जातीवरुन एक वादग्रस्त विधान केले आहे.
सुशांंत सिंंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरण हे बिहारच्या येत्या विधानसभा निवडणुकीतील (Bihar Assembly Elections) चर्चेचा मुद्दा ठरला आहे. कधी भाजप (BJP) कडुन सुशांंतच्या नावाचे पोस्टर, स्टिकर्स वाटले जातायत तर कधी भाजप कसं सुशांंतचा वापर करतंय हे सांंगत अन्य पक्षाकडुन प्रचार केला जातोय एकुण काय तर हे प्रकरण सध्या राजकीय दृष्ट्या सुद्धा बरेच तापलेले आहे, अशातच आता आरजेडी आमदार अरुण यादव (RJD MLA Arun Yadav) यांंनी एक वादग्रस्त विधान केले आहे. अरुण यादव यांंनी उत्साहात येत सुशांंतच्या जातीवरुन भाष्य केलं आहे, ते म्हणतात की, सुशांंत सिंंह हा राजपूत असुच शकत नाही कारण महाराणा प्रताप यांंचा वंशज कधी आत्महत्येचा विचार करुच शकत नाही, एक खरा राजपूत (क्षत्रिय) नेहमी लढायला तयार असतो, जर तो खरा क्षत्रिय असता तर त्याने सुद्धा लढा द्यायला हवा होता.
यापुर्वी सुशांंत सिंह राजपूत हे प्रकरण महाराष्ट्रातील सरकार मध्ये सुद्धा विरोधी आणि सत्ताधार्यांंमधील वादाचा मुद्दा ठरले होते. खरंंतर सुशांंत चा मृत्यु हा आत्महत्या होता की हत्या यावरही अजुन तपास सुरु आहे.
ANI ट्विट
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात AIIMS ची फॉरेन्सिक टीम (Forensic Team) अंतिम वैद्यकीय रिपोर्ट पुढील आठवड्यात सीबीआयकडे सादर करणार आहे. मेडिकल बोर्ड मिटिंग आणि त्यानंतर सीबीआयसोबत झालेल्या बैठकीनंतर फॉरेन्सिक टीम प्रकरण समजून घेण्याच्या प्रक्रीयेत असून पुढील आठवड्यात मेडिकल बोर्डाचे मत सीबीआयसमोर मांडण्यात येईल असे समजत आहे त्यानंंतर या प्रकरणात ठोस माहिती समोर येईल.