Mumbai Fire: गोरेगाव परिसरात उभ्या BEST च्या बसने घेतला पेट, प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
मुंबईतील अनेक परिसरात एका पाठोपाठ एक आगीच्या घटना घडत असल्याचे मागील काही दिवसात समोर आले आहे. गोरेगांव परिसरात बीएसटीच्या बसला अचानक आग लागल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं.
गोरेगाव: मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील दिंडोशी (Dindoshi) परिसरात एका बीएसटी (BEST Bus)च्या बसला आग लागल्याची घटना समोर येत आहे. दिंडोशी येथील कन्यापाडा, गोकुळधाम कॉलोनी (Gokuldham Colony) मध्ये उभ्या असलेल्या या बसने आज सकाळी साडे सातच्या दरम्यान अचानक पेट घेतला. यानंतर संपूर्ण बस अवघ्या काहीच मिनिटात जळून खाक झालेली दिसून आली. या जळत्या बसचा एक व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
गोरेगाव रेल्वे स्थानकातून निघालेली ही बस नागरी निवारा प्रकल्पाच्या दिशेने जात असताना सीएनजी टॅंक मध्ये दबाव वाढल्याने एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर लगेचच बसच्या डाव्या चाकात दबाव न सहन झाल्याने या टॅंक ने पेट घेतला. संपूर्ण बसमधील दोन रिअर टायर्स वगळता अख्खी बस जाळून खाख झाली आहे, यानंतर या बसला दिंडोशी बस डेपो मध्ये नेण्यात आले आहे. Mumbai Fire: माटुंगा येथील 'बिग बाजार'ला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना
ही घटना घडत असताना बसमध्ये केवळ बसचालक आणि कंडक्टरच उपस्थित होते. बसला आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ बसमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)