Bengaluru Moving Car Gang-Rape: पार्कमधून उचलेल्या महिलेवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील चाहरी आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसू चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ही घटना पाठिमागील आठवड्यात 25 मार्च रोजी घडली आहे.

Gang-Rape |Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

बंगळुरु (Bengaluru) येथे महिलेवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार (Gang-Rape) केल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणचे आरोपींनी पीडितेला उद्यानामधून उचलले आणि तिला कारमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Bengaluru Moving Car Gang-Rape) केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील चाहरी आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसू चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ही घटना पाठिमागील आठवड्यात 25 मार्च रोजी घडली आहे. पीडित महिला बंगळुरु येथील कोरमंगला परिसरातील नॅशनल गेम्स व्हिलेज पार्कमध्ये मित्राला भेटायला गेली होती. पीडित महिला आणि तिचा मित्र रात्री उशीरपर्यंत उद्यानात बसले होते. रात्री उशीरपर्यंत उद्यानात का बसला आहात म्हणून आरोपींनीन या युगुलाला हटकले. तसेच, त्याच्यां उशीरपर्यंत पार्कमध्ये बसण्याला दोन आरोपींनी आक्षेप घेतला.

दरम्यान, आरोपींच्या टोकण्याला कंटाळेले हे युगूल उद्यानातून उठून निघाले. या वेळी एका आरोपीने महिलेला कारमध्ये खेचले. चारही आरोपींनी महिलेल कारमध्ये घेऊन रात्रभर प्रवास केला. प्रवासादरम्यान चालत्या कारमध्ये तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी आरोपींनी पहाटे तिला तिच्या घराजवळ सोडले. पीडितेला सोडताना आरोपींनी धमकी दिली की, घडला प्रकार जर पोलिसांना सांगितला तर त्याचे परिणाम भयंकर होतील.

बेंगळुरूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सीके बाबा यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. अधिकृत तक्रार दाखल करण्यापूर्वी बलात्कार पीडितेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, असेही पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: शिक्षिकेने केला 16 वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार; दाखवले चांगल्या मार्कांचे आमिष)

सामूहिक बलात्कार हा एक अक्षम्य गुन्हा आहे. ज्यामध्ये लोकांचा समूह एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार करतो. हा एक लैंगिक हिंसाचाराचा प्रकार आहे. ज्यामुळे पीडितेला महत्त्वपूर्ण शारीरिक आणि भावनिक हानी होऊ शकते. सामूहिक बलात्कार हे पीडितेच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे आणि बहुतेक देशांमध्ये हा गंभीर गुन्हेगारी गुन्हा मानला जातो. सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना तुरुंगवासासह गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की बलात्कार आणि लैंगिक अत्याचार हे कधीही पीडिते व्यक्तीचा दोष नसतो. परिस्थिती काहीही असो. वैद्यकीय सेवा, समुपदेशन आणि कायदेशीर सहाय्य यासह लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्यांना समर्थन आणि संसाधने प्रदान करणे आवश्यक आहे. बलात्कार, सामूहिक बलात्कार किंवा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक हिंसाचाराची घटना आपल्या निदर्शनास आली तर पीडितेला मदत करणे आवश्यक आहे. विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा व्यावसायिक संस्थेकडून त्वरित मदत घेणे आवश्यक आहे.