Bengaluru: वाहतूक कोंडीत अडकातच सोडली कार; 3 किलोमिटर अंतर 45 मिनिटांत पार करत शस्त्रक्रियेसाठी पोहोचले डॉक्टर

हा व्हिडिओ आहे एका डॉक्टरचा. शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात निघालेले एक डॉक्टर बंगळुरु शहरातील महाकाय वाहतुक कोंडीत अडकले. त्यामुळे डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता कार वाहतूक कोंडीतच सोडली आणि थेट रस्त्याने धावायला सुरुवात केली.

Dr Govind Nandakumar | (Photo Credit - Twitter)

वाहतुक कोंडी ही मुंबई, पुणे, बंगळुरु (Bengaluru), दिल्ली या शहरांची सामायिक ओळख. या शहरांतील सर्वच नागरिकांना वाहतुक कोंडीचा (Massive Traffic) प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागते. बंगळुरुमधील अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Bengaluru Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ आहे एका डॉक्टरचा. शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात निघालेले एक डॉक्टर बंगळुरु शहरातील महाकाय वाहतुक कोंडीत अडकले. त्यामुळे डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता कार वाहतूक कोंडीतच सोडली आणि थेट रस्त्याने धावायला सुरुवात केली. रस्त्याने धावत सुमारे 3 किलोमीटर इतके आंतर अवघ्या 45 मिनीटांमध्ये पार करत डॉक्टरांनी रुग्णालय गाठले.

मणिपाल हॉस्पिटल्सचे ( Manipal Hospitals) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्जन डॉ. गोविंद नंदकुमार यांची ही प्रेरणा देणारी कहाणी आहे. घटना आहे 30 ऑगस्टची. डॉ.गोविंद नंदकुमार हे जठरांत्रमार्गाच्या रोगांचा अभ्यासक आणि शल्यविशारद म्हणजेच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीस्ट (Gastroenterology Surgeon ) आहेत. ते एका अत्यंत गुंतागुंत आणि तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाकडे आपल्या कारने निघाले होते. मात्र, मध्येच त्यांची कार वाहतुक कोंडीत अडकली. नियमीतच्या वाहतुक कोंडीचा अनुभव असलेल्या डॉ. गोविंद यांना पटकण अंदाज आला. त्यांनी कार रस्त्यातच सोडली आणि त्यांनी रस्त्याने धावत जात हॉस्पिटल गाठले.

डॉ.गोविंद नंदकुमार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी हॉस्पिटल नजीक होतो. मात्र, वाहतूक कोंडीत अडकलो होतो. मला ससत लक्षात येत होते की आपल्याला उशीर होतो आहे. माझे सहकारी तिथे काम करत होते. मात्र, शेवटच्या स्ट्रेचला 10 मिनीटे लागतात. मी घाबरलो होतो. एका व्यक्तीचे आयुष्य माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मी गुगल मॅपचा वापर केला. त्यावर 45 मिनीटे लागतील असे दाखवले. मी लगेच धावत जाण्याचा निर्णय घेतला.

डॉ. गोविंद नंदकुमार सांगतात, मी दररोज मध्य बंगळुरू ते सर्जापूर येथील मणिपाल हॉस्पिटल्स (जे बंगलोरच्या आग्नेयेला आहे) असा प्रवास करतो. मी शस्त्रक्रियेसाठी वेळेत घर सोडले. माझी टीम तयार झाली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये पोहोचताच शस्त्रक्रिया करण्यासाठी येणार होती. माझ्या सहकाऱ्यांनी तयारीही केली होती. पण रस्त्यात प्रचंड ट्रॅफीक लागले. ते पाहून पाहून मी ड्रायव्हरसोबत गाडी सोडण्याचा निर्णय घेतला कोणताही विचार न करता हॉस्पिटलच्या दिशेने पळत सुटलो.

ट्विट

ऑपरेशन रूममध्ये प्रवेश करताच डॉ. नंदकुमार यांची टीम कामाला लागली डॉक्टरांनी त्वरीत शस्त्रक्रियेला सुरुवात केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रुग्णाला वेळवर डिस्चार्जही मिळाला.

मुसळधार पावसामुळे बंगळुरु शहरात पाणी साचले असून वाहतूक कोंडी झाली आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात बंगळुरू-म्हैसूर महामार्गावरील लांब पाणी साचलेल्या मार्गावर अडकलेली वाहने आणि पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होत असल्याचे व्हायरल व्हिडिओत पाहायला मळत आहे.