Bengaluru Accident: ट्रकची धडक लागल्याने कारला आग, घटनेत आईसह चिमुकलीचा मृत्यू, तर दोघे जण बचावले

बेंगळूरू येथील नाईस रोडवर मंगळवारी एका ट्रकची धडक कारला आग लागल्याने एक महिला आणि तीच्या मुलीचा जळून मृत्यू झाला आहे.

Accident (PC - File Photo)

Bengaluru Accident: बेंगळूरू (Bengaluru) येथील नाईस रोडवर मंगळवारी एका ट्रकची धडक कारला आग लागल्याने एक महिला आणि तीच्या मुलीचा जळून मृत्यू झाला आहे. कार मध्ये उपस्थित असलेले वडिल आणि दुसरी मुलगी गंभीर जखमी झाले आहे. या अपघाती घटनेच दोघे बचावले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सिंधू असं मृत महिलेचे नाव आहे. ट्रकला धडकल्या नंतर कारने अचानक पेट घेतला यात दोन जण दगावले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतला. अपघाती मृत्यूची नोंद घेतली.

मीडिया रिपोर्टनुसार, बेंगळूरू येथी नाईस रोडवर सोमपूराजवळ  मंगळवारी सकाळीच्या दरम्यान अपघात झाला. महेंद्र आणि त्याची पत्नी सिंधू सोबत दोन मुली कारमधून जात असताना ही घटना घडली.  पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास म्हैसूर रोडवरून कनकापुरा रोडकडे जात असलेल्या महेंद्रनचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती ट्रकला धडकून भिंतीवर आदळली. गाडीने लगेच पेट घेतला.

गाडीत उपस्थित असलेला दोघांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वडिल आणि मुलगी बाहेर पडले. परंतु आई आणि चिमुकलीला बाहेर पडता आले नाही दोघी अटकल्या यात कारने जोरात पेट घेतला आणि दोघांचाही जळून मृत्यू झाला. पोलिसी घटनास्थळी दाखल झाले. दोघांचा मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवला. वडिला आणि एका बचावलेल्या मुलीचा उपाचर रुग्णालयात सुरु आहे. या घटनेमुळे काही वेळ रस्त्यावर वाहतूक सेवा ठप्प होती.



संबंधित बातम्या

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील