Mamata Banerjee writes to non-BJP CMs: भाजप विरोधात सर्वांनी एकत्र या! ममता बॅनर्जी यांचे भाजपेत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्र सरकार द्वारा केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या गैर वापराविरुद्ध जोरदार आवाज उठवला आहे. केंद्रायच्या या गैरप्रकाराविरोधात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी एकत्र येत लढा देण्याची आवश्यकता असल्याचे ममतांनी म्हटले आहे.

Mamata Banerjee | (Photo Credits: Facebook)

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्र सरकार द्वारा केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या गैर वापराविरुद्ध जोरदार आवाज उठवला आहे. केंद्रायच्या या गैरप्रकाराविरोधात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी एकत्र येत लढा देण्याची आवश्यकता असल्याचे ममतांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात एकत्र यावे असे अवाहन करत भाजपेत्तर सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही (Mamata Banerjee Oppn leaders) लिहीले आहे. याशिवाय त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात एक बैठकही आयोजित केली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील बीरभूम हिंसाचार प्रकरमावरुन सध्या वाद सुरु आहे.

प्रासारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षाला सत्ताधारी सरकारला जबाबदार धरण्यासाठी एकत्र यावे लागेल. विरोधक म्हणून आमची घटनात्मक जबाबदारी आहे की, या सरकारला त्याच्या कामाबद्दल जबाबदार धरायला पाहिजे. केंद्र सरकार त्यांच्या विरोधात असलेला असंतोष दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मी सर्वांनी एका ठिकाणी बैठक बोलवावी जेणेकरुन पुढील रस्ता ठरविण्यासाठी विचार केला जाईल. ही काळाची गरज आहे. देशातील सर्व विकासशील पक्षांनी दमनाविरुद्ध एकत्र येऊन या भाजपची ताकत तोडायला हवी. (हेही वाचा, Coal Scam: Mamata Banerjee यांचे पुतणे Abhishek Banerjee यांना ED चे समन्स; कोळसा घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी)

ममता यांनी पुढे म्हटले आहे की, मी या देशाच्या लोकशाहीवर सत्ताधारी भाजपकडून होत असलेल्या थेट हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करते आहे. म्हणूनच लिहीते आहे. ईडी, सीबीआय, सेंट्रल विजेलेन्स कमिशन (CVC), आणि आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा बदला घेण्याच्या वृत्तीने वापरल्या जात आहेत. विरोधकांना कमजोर करण्यासाठी या यंत्रणा वापरल्या जात असल्याचेही ममतांनी म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement