Dormant Accounts Bank Froud: निष्क्रीय खात्यांवर बँक अधिकाऱ्याचा डल्ला, परस्पर काढले 1.26 कोटी रुपये; आरोपीस अटक

जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir Bank) रियासी जिल्ह्यात तीन वर्षांच्या कालावधीत निष्क्रिय खात्यांमधून 1.26 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परस्परच वळती करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँक व्यवस्थापन आणि ग्राहक यांची फसवणूक केल्याबद्दल या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या सहाय्यक व्यवस्थापकास पोलिसांनी अटक केली आहे.

Dormant Accounts Bank Froud: निष्क्रीय खात्यांवर बँक अधिकाऱ्याचा डल्ला, परस्पर काढले 1.26 कोटी रुपये; आरोपीस अटक
Arrested | (File Image)

जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir Bank) रियासी जिल्ह्यात तीन वर्षांच्या कालावधीत निष्क्रिय खात्यांमधून 1.26 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परस्परच वळती करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँक व्यवस्थापन आणि ग्राहक यांची फसवणूक केल्याबद्दल या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या सहाय्यक व्यवस्थापकास पोलिसांनी अटक केली आहे. इश्विंदर सिंग रन्याल असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि कश्मीर बँकेच्या पौनी शाखेत हा प्रकार घडला. बँकेच्या निष्क्रीय खात्यांतून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढली गेल्याचा धक्कादायक प्रकार बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरु होती. चौकशीमध्ये ही रक्कम बँक अधिकऱ्यानेच काढल्याचे पुढे आले.

बँकेत झालेल्या अपहार प्रकरणी बँक प्रशासनाने पलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहिता शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. पण, धक्कादायक असे की, आरोपी हा कोणी बाहेरील व्यक्ती नसून ती बँकेतीलच अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. उपलब्ध पुराव्यांनुसार पोलिसांनी संशयीत आरोपी इश्विंदर सिंग रन्याल यास ताब्यात घेतले आहे. रन्याल हा ज्या बँकेत हा घोटाळा घडला त्याच बँकेच्या शाखेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आरोपी इश्विंदर सिंग रन्याल याने एकदम हा गुन्हा केला नाही. त्याने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करुन पाठिमागील तीन वर्षांपासून हा प्रकार केला आहे. तीन वर्षांच्या एकूण कालावधीत त्याने थोडे थोडे असे तब्बल 126.34 लोख रुपयांवर डल्ला मारला. ही सर्व रक्कम त्याने बेकायदेशीरपणे इतर खात्यांवर वळवली. ही रक्कम वळती करण्यापूर्वी त्याने निष्क्रीय असलेली सर्व खाती सक्रीय केली. ज्यामुळे ती पुन्हा व्यवहारात आली आणि त्याला त्या खात्यांवरील रक्कम वळती करणे अतिशय सोपे झाले.

दरम्यान, ज्या खात्यावर प्रदीर्घ काळ, खास करुन बँकेने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेमध्ये कोणताही व्यवहार केला जात नाही ती खाती निष्क्रीय समजली जातात. ही खाती निष्क्रीय खाती म्हणून परिभाषीत केली जातात. ही सर्व खाती दावा न केलेली मालमत्ता मानली जातेआणि ती राज्य सरकारने लागू केलेल्या नियमक संकेत आणि कायद्यांच्या अधीन असतात. देशभरामध्ये निष्क्रीय खात्यांमध्ये असलेली रक्कम बरीच मोठी असल्याचे सांगितले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2024 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).