IPL Auction 2025 Live

Baba Ka Dhaba चे मालक Kanta Prasad यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न, दिल्लीच्या Safdarjung Hospital मध्ये दाखल

झोपेच्या गोळ्या आणि अल्कोहलचे सेवन करून कांता प्रसाद यांनी आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. असे मीडीया रिपोर्ट्स आहेत.

Baba Ka Dhaba in Delhi (Photo Credits: Twitter)

‘बाबा का ढाबा’ (Baba Ka Dhaba) चे मालक 80 वर्षीय कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुरूवार (17 जून) च्या रात्री त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून सध्या दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) दाखल आहेत. रात्री सव्वा अकराच्या सुमारास सफदरजंग रुग्णालयातून पोलिसांना कांता प्रसाद यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन कांता प्रसाद यांची ओळख पटवली आहे.

दरम्यान इंडियन एक्सप्रेसला पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, कांता प्रसाद मागील काही दिवस नैराश्यामध्ये होते. झोपेच्या गोळ्या आणि अल्कोहलचे सेवन करून कांता प्रसाद यांनी आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

कांता प्रसाद हे काही महिन्यांपूर्वी अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टार झाले होते. युट्यूबर गौरन वासव याने कांता प्रसाद यांचा व्हिडीओ शूट करत त्यांची परिस्थिती दाखवली. त्यांच्या जेवणाची स्तुती केली होती. त्यानंतर रातोरात त्यांच्या ढाब्यावर खवय्यांची गर्दी होण्यास सुरू झाली. पुढे त्यांनी एक रेस्टॉरंट देखील सुरू केले पण ते काही महिन्यांतच बंद करून कांटा प्रसाद पुन्हा रस्त्याकिनारी असणार्‍या त्यांच्या गाडीवर परतले होते. Baba Ka Dhaba चे मालक Kanta Prasad यांनी दिल्लीमध्ये सुरू केलं नवीन रेस्टॉरंट; पहा फोटोज.

दरम्यान कांता प्रसाद यांच्या पत्नीने ANI ला प्रतिक्रिया देताना त्यांनी कशाचं सेवन केले याची माहिती नसल्याचं सांगितलं आहे. डॉक्टरांनी अद्याप  काही सांगितले नाही तसेच कांता प्रसाद यांच्या मनात काय सुरू होते याची देखील माहिती नसल्याचं बदामी देवी म्हणाला.

दक्षिण दिल्लीत मालवीय नगर मध्ये कांता प्रसाद यांचा ढाबा आहे. बाबा का ढाबा च्या मालकांच्या माहितीनुसार, रेस्टॉरंटचा खर्च 1 लाख असताना त्यांना केवळ 30 हजार रूपये मिळत होते.