अयोध्या निकालानंतर अभिनेता परेश रावल यांनी शेअर केला 'लोकसभा 2024' चा जाहीरनामा; 'मोदी है तो मुमकिन है' म्हणत घेतला काँग्रेसला चिमटा

ट्विटच्या माध्यमातून भाजपाचे समर्थन करत काँग्रेसला (Congress) शाब्दिक चिमटा घेतला आहे.

Paresh Rawal (Photo Credits: Twitter)

भारताच्या राजकीय ऐतिहासतील सर्वात मोठा खटला म्हणजेच अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्रकरणावर काळ सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय समोर आला. यानुसार, तीन महिन्यात एक ट्रस्ट स्थापन करून मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आले आहे तर सोबतच  मशिदीसाठी देखील 5 एकर जमीन देण्याचे न्यायायलायाने सूचित केले आहे.. मागील 125 वर्षाचा इतिहास असणाऱ्या या खटल्याच्या निकालानंतर सर्वसामान्यांपासून ते राजकीय तसेच काही बॉलिवूडकर मंडळींनी सुद्धा सोशल मीडियातुन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशातच आता अभिनेता परेश रावल (Paresh Rawal)  यांचे एक ट्विट खास चर्चेत येत आहे. रावल यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपाचे समर्थन करत काँग्रेसला (Congress) शाब्दिक चिमटा घेतला आहे. यासाठी लोकसभा 2024 साठी भाजपा (BJP) आणि काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा शेअर करत दोन्ही पक्षांनी दिलेल्या आश्वासनाची रावल यांनी उजळणी करून दिली आहे.

परेश रावल यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदी है तो मुमकीन है असे म्हणत लोकसभा 2024च्या अनुषंगाने दोन्ही पक्षांचा जाहीरनामा शेअर केला. अर्थात हा जाहीरनामा प्रतीकात्मक होता. यानुसार, भाजपाने मागील निवडणुकीत दिलेले आश्वासन जसे की, तिहेरी तलाक बरखास्त करणे, राम मंदिर उभारणी, कलम 370 हटवणे हे मुद्दे पुढील वेळीस शिल्लक राहणार नाहीत असे म्हंटले आहे तर काँग्रेसला मागील कित्येक वर्षांपासून गरिबी हटाव या एकमेव मुद्द्यावरही यश न आल्याचे रावल यांनी म्हंटले आहे.

परेश रावल ट्विट

Ayodhya Verdict: 'अयोध्या निकालाचा भारतीय म्हणून स्विकार करा', बॉलिवूड कलाकार स्वरा भास्कर, अनुपम खेर यांच्यासह बी-टाउनचे नागरिकांना शांततेचे आवाहन

दरम्यान, काल अयोध्येच्या निकालानंतर जिथे सर्व राजकीय मंडळींनी न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक केले होते तिथेच काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपाला टोलवण्याची संधी हेरत आता मंदिर बनल्याने भाजपाला हिंदुत्वाच्या आड राजकारण करण्याची संधी मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. तर दुसरेकडे बॉलिवुडच्या काही कलाकारांनी देखील आता मंदिर बनवणे झाले असेल तर पुढे देशाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे असा सल्ला सरकारला दिला होता.