ATM शुल्कात घट करण्याचे 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चे संकेत
अन्य बँकांचे एटीएम वापरता आकारण्यात येणारे शुल्क कमी किंवा रद्द करण्यात येणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत.
अन्य बँकांचे एटीएम वापरता आकारण्यात येणारे शुल्क कमी किंवा रद्द करण्यात येणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या महानगरांमध्ये महिन्यातून पाच वेळा अन्य बँकांचे एटीएम विनाशुल्क वापरता येते. (गृहकर्ज, वाहन कर्ज होणार स्वस्त, RBI ची सर्वसामान्यांना भेट)
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांकडून एटीएमचा मोठ्या प्रमाणावर होत असून तो वापर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे एटीएमच्या वापरासाठी शुल्क कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेत ही समस्या सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींसह बँकांचे अधिकारी आणि ग्राहकांच्या प्रतिनिधींचाही समावेश होणार आहे. तर समितीचे अध्यक्ष 'इंडियन बँक्स असोसिएशन'चे चेअरमन असतील.
एटीएमच्या वापरासाठी आवश्यक त्या सर्व शुल्कांची समीक्षा करून योग्य त्या शिफारशी या समितीकडून करण्यात येतील. दोन महिन्यात या समितीचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर आठवडाभरात शिफारशी अंमलात आणण्याचा बँकेचा प्रयत्न असेल.