Umesh Pal Murder Case: अतिक अहमदच्या वकीलाला अटक; उमेश पालचं लोकेशन मारेकऱ्यांना शेअर केल्याचा आरोप

प्रयागराजमधील प्लाय व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी वकील विजय मिश्रा यांच्यावर याआधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Umesh Pal

उमेश पाल हत्येप्रकरणात (Umesh Pal Murder) एक मोठी अपडेट घडली आहे. या प्रकरणी आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) स्पेशल टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. यूपी एसटीएफने (Special Task Force) माफिया अतिक अहमदचा वकील विजय मिश्रा (Vijay Mishra) याला लखनौमधून अटक केली आहे, उमेश पाल हत्येचा कट (Umesh Pal Murder Case) रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. उमेश पालचे लोकेशन शूटर्सना शेअर केल्याचा आरोप विजय मिश्रावर आहे. विजय मिश्रा लखनौच्या हयात हॉटेलमध्ये एका महिलेसोबत राहत होते. (हेही वाचा - Delhi Shoe Factory Fire Video: दिल्लीच्या उद्योग नगरमधील बुटांच्या कारखान्याला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या)

सध्या विजय मिश्रा यांच्यासोबत हयात हॉटेलमध्ये थांबलेल्या महिलेबाबत माहिती गोळा केली जात आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरु आहे. महिलेचे माफिया अतिकशी थेट संबंध असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र, तसे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. विजय मिश्राबाबत असाही दावा केला जात आहे की, 15 एप्रिलला अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येच्या रात्री तो कोल्विन हॉस्पिटलबाहेर उपस्थित होता.

प्रयागराजमधील प्लाय व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी वकील विजय मिश्रा यांच्यावर याआधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वकिलाचे अतिकच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे. उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिचा शोध सुरु आहे. तिला शोधणाऱ्यासाठी 50 हजार रुपयांचं बक्षीस देखील घोषित करण्यात आलं आहे.