Assembly Election Results 2023 Updates: पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी; भाजप विरुद्ध काँग्रेस काट्याची टक्कर
या निवडणुकीकडे सन 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.
Assembly Election Results 2023: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि राजस्थानमधील (Rajasthan) विधानसभा निवडणुकांचे बहुप्रतीक्षित निकाल जाहीर होणे काही तासांच्या अंतरावर आले आहे. असून आज (3 डिसंबर) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुका विधासभेच्या असतील तरी त्याच्याकडे लोकसभा निवडणू 2024 ची लिटमस टेटस्ट म्हणून पाहिले जात आहे. परिणामी या राज्यांमध्ये प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस असा निकराचा सामना पाहायला मिळत आहे. शिवाय एनडीएतील घटक पक्ष विरुद्ध इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असाही सामना रंगला आहे. या पाच राज्यांमधील 16 कोटींहून अधिक मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
मिझोराम वगळता उर्वरीतच चार राज्यांमध्ये मतमोजणी
सन 2023 या वर्षातील हा शेवटचा महिना आहे. शेवटच्या महिन्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोराम या राज्यांमध्ये निवडणुका पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यापैकी मिझोराम वगळता उर्वरीतच चार राज्यांचे निकाल अवघ्या काही तासांमध्ये जाहीर होतील. त्यासाठी थोड्याच वेळात म्हणजे आज सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. ही निवडणूक विविध टप्प्यांमध्ये पार पडली. जस की, मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान झाले. राजस्थान आणि तेलंगणामध्ये अनुक्रमे 25 आणि 30 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला मतदान झाले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत 16 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीत संपत आहे, तर मिझोरामचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. (हेही वाचा, Madhya Pradesh: 'फिर आ रहे है कमलनाथ', मध्यप्रदेश काँग्रेसची निकालाआधीच पोष्टरबाजी)
एक्झिट पोल्सचे अंदाज संमिश्र
दरम्यान, मतमोजणी झाली त्या दिवशी विविध प्रसारमाध्यमे आणि संस्थांनी आपापले एक्झिट पोल्स जाहीर केले. ज्यामध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला. एक्झिट पोल हा एक सर्वेक्षण असते. जे लोकांनी आपापल्या उमेदवारांना मतदान केल्यानंतर लगेचच केले जाते. एक्झिट पोल विधानसभा निकालांचे संकेत देतत. पण, ते केवळ अंदाज असतात. प्रत्यक्ष निकाल तसे लागतातच असे नाही. त्यामुळे त्याकडे वास्तवता म्हणून पाहिले जात नसले तरी एक संकेत आणि चाचपणी म्हणून गांभीर्याने पाहिले जाते.
मतमोजणीपूर्वी राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे
मतमोजणीपूर्वी राजकीय पक्षांकडून जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहे. जसे की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल. आम्ही उद्या मतमोजणीची वाट पाहत आहोत. मला विश्वास आहे की पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, तीनही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असेल. तेलंगणा आणि मिझोराममध्येही आम्ही चांगली कामगिरी करू, असे भाजपच्या एका नेत्याने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या काही पक्ष कार्यालयांमध्ये कमलनाथ यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करत थेट पोस्टबाजीही करण्यात आली आहे. त्यामुळे निकालांबाबत उत्सुकता वाढली आहे.