Assam Flood: असम राज्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत, एक लाख नागरिकांना फटका

पूरग्रस्तांसाठी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये 49 मदत वितरण केंद्रे आणि 17 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत

Assam Floods

असाममध्ये (Aasam Flood) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पूरस्थिती गंभीर झाली आहे. पावसाळ्याच्या पहिल्या पुरामुळे सुमारे एक लाख लोक बाधित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) ताज्या बुलेटिननुसार, बिस्वनाथ, चिरांग, दारंग, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, शिवसागर, सोनितपूर आणि तमूलपूर जिल्ह्यात 98,840 लोक अजूनही पुराच्या पाण्याशी झुंज देत आहेत.  (हेही वाचा - Lucknow News: फुल तोडण्याच्या बहाण्याने आला अन् महिलेच्या गळातील सोन्याची चैन चोरली, लखनऊ मधील हा व्हिडिओ व्हायरल)

असममध्ये आतापर्यंत मृतांची संख्या सात आहे. ASDMA नुसार, डिखौ आणि ब्रह्मपुत्रा नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. शिवसागर आणि ब्रह्मपुत्रेतील डिखाऊ धुबरी, तेजपूर आणि नेमतीघाटमध्ये धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत आहे. ASDMA नुसार, 3,618.35 हेक्टर शेतजमीन नष्ट झाली असून 371 गावे पाण्याखाली गेली आहेत.

पूरग्रस्तांसाठी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये 49 मदत वितरण केंद्रे आणि 17 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. ASDMA नुसार, गोलाघाट जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे, जेथे 28,965 लोक पुराशी झुंज देत आहेत. धेमाजी आणि शिवसागरमध्ये अनुक्रमे 28,140 आणि 13,713 लोकसंख्या बाधित झाली आहे. ASDMA आकडेवारीनुसार, सुमारे 59,531 पाळीव जनावरे पुरामुळे प्रभावित झाली आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

BAN W vs NEP W, ICC Women's U19 T20 World Cup, 2025 Scorecard: अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात बांगलादेशची विजयाने सुरुवात, नेपाळवर 5 विकेट्सने केली मात; सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पाहा

Amravati Shocker: आधी लोखंडी सळ्यांचे चटके...मग लघवी पाजली, कुत्र्याची विष्ठा खायला लावली; काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण

Beed Shocker: बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिक सुरुचं! प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापला बॉयफ्रेड; थेट गर्लफ्रेडच्या घरी जाऊन खिडकीतून केला गोळीबार

KAR vs VID Vijay Hazare Trophy Final Live Streaming: कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात जेतेपदाची लढाई, कोणत्या 'ओटीटी' आणि 'चॅनल'वर पाहून घेणार सामन्याच आनंद; घ्या जाणून

Share Now