अशोक गेहलोत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, सचिन पायलट उपमुख्यमंत्री

तसेच, शुक्रवारी पुन्हा एकदा सचिन पायलट, अशोक गेहलोत आणि राहुल गांधी यांच्यात पुन्हा एकदा संयुक्त बैठक झाली.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट (Photo courtesy: Facebook)

राजस्थानचे मुख्यमंत्री (Chief Minister of Rajasthan) म्हणून अशोक गेहलोत (Ashok Gehlot) तर, उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) म्हणून सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसने शुक्रवारी (14 डिसेंबर) दुपारनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. दरम्यान, गेहलोत आणि पायलट या दोन नेत्यांच्या नावांची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होती. मात्र, दोघांपैकी मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव पुढे केले जाणार याबबत उत्सुकता होती. महत्त्वाचे म्हणजे दोघांनीही मुख्यमत्री पदावर दावेदारी सांगितली होती आणि दोघेही त्यावर शेवटपर्यंत ठाम होते. अखेर ज्येष्ठत्वाच्या अधारे गेहलोत यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले तर, पायलट यांची निवड उपमुख्यमंत्रीपदासाठी करण्यात आली.

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून अशोक गेहलोत किंवा राजेश पायलट या दोघांपैकी एकाचे नाव पुढे केले जाईल हे नक्की होते. मात्र, दोघांपैकी नेमके कोण याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज दुपारी ट्विटरद्वारे एक छायाचित्र शेअर केले होते. यात राहुल गांधी यांच्या डाव्या बाजूला सचिन पायलट (Sachin Pilot)तर, उजव्या बाजूला अशोक गेहलोत दिसतात. गेहलोत आणि पायलट यांच्या हसऱ्या भावमुद्रेतील या छायाचित्राखाली राहुल यांनी 'यूनाइटेड कलर्स ऑफ राजस्थान' अशी कॅप्शनही लिहीली होती. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या नावावर लवकरच शिकामोर्तब होणार हे नक्की होते. (हेही वाचा, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांच्या नावाची घोषणा!)

दरम्यान, गुरुवारी रात्री सचिन पायलट आणि अशोक गेहलोत असे दोन्ही नेते स्वतंत्रपणे राहुल गांधी यांनी भेटले. तसेच, शुक्रवारी पुन्हा एकदा सचिन पायलट, अशोक गेहलोत आणि राहुल गांधी यांच्यात पुन्हा एकदा संयुक्त बैठक झाली. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही काँग्रेस एक असल्याचा संदेश जावा यासाठी राहुल गांधी एकत्र आहेत. मात्र, राजस्थानमध्ये राहुल गांधींचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हते. पण, काँग्रेस नेतृत्वाने त्यावर मुत्सद्दीपणे तोडगा काढला.