4G Internet Services in Jammu and Kashmir: अनुच्छेद 370 हटवल्यानंतर तब्बल 18 महिन्यानंतर जम्मू कश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा खुली
अनुच्छेत 370 हटविल्यानंतर जम्मू कश्मीर दोन भागात विभागण्यात आले.
विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद 370 हटविल्यानंतर तबबल 18 महिन्यांनी जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) राज्यात 4G इंटरनेट सेवा (4G Internet Services) सुरु करण्यात आली आहे. अनुच्छेद 370 हटविल्यानंतर या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी संसदेत कायदा करुन केंद्र सरकारने या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 हटविले होते. तेव्हापासून या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. जगातील सर्वात मोठा इंटरनेट शटडाऊन म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली. जम्मू कश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी म्हटले की, संपूर्ण जम्मू कश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.
जम्मू कश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेत 370 हटविल्यामुळे काही लोक इंटरनेटच्या माध्यमातून समाजविघातक माहिती पसरवतील या कारणावरुन हा निर्णय घेण्यात आला होता. अनुच्छेत 370 हटविल्यानंतर जम्मू कश्मीर दोन भागात विभागण्यात आले. एक जम्मू-कश्मीर आणि दुसरा लद्दाख असे दोन केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले. तेव्हा या राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला और महबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. (हेही वाचा, Farmers' Protest: शेतकरी आंदोलनाबाबत खोटी आणि चिथावणीखोर माहिती पोस्ट करणाऱ्या 250 ट्विटर खात्यांवर बंदी; भारत सरकारने पाठवली होती कायदेशीर नोटीस)
प्रशासनाने म्हटले होते की, मोबाईल इंटरनेट सेवा (Mobile internet services) चुकीचे संदेश, माहिती पसरविणे आणि दहशतवाद्यांकडून चालविण्यात येणाऱ्या नेटवर्कचा दुरुपयोग करणे आदींमुळे इंटरनेट सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे हजारो रोजगार बुडाल्याची टीका विरोधक आणि सरकारच्या टीकाकारांनी केली होती.