दिल्ली मेट्रो सुरु होण्याआधीच DMRC च्या 20 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; सर्व Asymptomatic रुग्ण असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे, अशात हा संसर्ग आता दिल्ली मेट्रोपर्यंत (Delhi Metro) पोहोचला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (DMRC) सुमारे 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

गेल्या अनेक दिवसांपासून देशभर कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे, अशात हा संसर्ग आता दिल्ली मेट्रोपर्यंत (Delhi Metro) पोहोचला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (DMRC) सुमारे 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. यासंदर्भात अधिक माहिती देताना दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जे कर्मचारी सकारात्मक आढळले आहेत त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाही. हे सर्व लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण बरे होत असल्याची माहितीही मिळत आहे. कोरोना विषाणूमुळे डीएमआरसीने मार्च अखेरपासून दिल्ली मेट्रोचे कामकाज थांबवले आहे.

गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्येही मेट्रोला पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली नाही. अनलॉक 1 अंतर्गत जारी केलेल्या धोरणानुसार, जुलैनंतर दिल्ली मेट्रो, गाड्या आणि आंतरराष्ट्रीय विमाने यावर निर्णय घेण्यात येईल. असे सांगितले जात आहे की, की जुलैमध्ये शाळा आणि महाविद्यालये उघडल्यानंतर मेट्रो सुरु करण्याचा विचार केला जाऊ शकतो. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने असे म्हटले आहे की, सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर पुढील सूचना येईपर्यंत मेट्रो सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच राहतील.

शुक्रवारी दिल्ली मेट्रो व्यतिरिक्त संरक्षण संशोधन व विकास संघटनेचा (DRDO) कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, त्यानंतर एक मजला बंद करुन स्वच्छ केला जात आहे. दरम्यान, देशात ज्या ठिकाणी कोरोनाची साव्रधिक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामध्ये राजधानी दिल्लीदेखील आहे. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह 25,004 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 14456 सक्रिय रूग्ण आहेत, तर 9898 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत 650 लोकांचा मृत्यू झाला आहे.